कुठून आली माहीत नाही, दारूची बाटली थेट शंभुराज देसाईंच्या गाडीवर; एकच खळबळ उडाली
शंभूराज देसाई यांच्या वाहनांचा ताफा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी निघाला होता. यादरम्यान पोवई नाक्यावर त्यांच्या गाडीवर अचानक बाटली पडली.
सातारा : राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shamburaj Desai) यांच्या गाडीवर पोवई नाक्यावर अचानक एक बाटली पडली. देसाईंच्या ताफ्यावर हल्ला हल्ला झाला या शंकेने तणाव निर्माण झाला. बाटली पडल्यावर काही वेळासाठी ताफा थांबवण्यात आला. मात्र पोलिसांनी (Satara Police) तपास केल्यानंतर दारूच्य नशेत एका व्यक्तीने कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दारुड्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शंभूराज देसाई यांच्या वाहनांचा ताफा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी निघाला होता. यादरम्यान पोवई नाक्यावर त्यांच्या गाडीवर अचानक बाटली पडली. पोलिसांनी सीसीटीव्हीचा तपास केल्यानंतर ही घटना एकाने दारूच्या नशेत पाण्याची बॉटल फेकल्याचे समोर आले. नम्या यंत्र्या भोसले (45 वर्षे) असे दारुड्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सुशांत कदम यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
नेमकं काय घडलं?
पोवई नाका येथे नम्या भोसलेचा एकाचा शेंगदाणे-फुटाणे विकणाऱ्यासोबत रस्त्याच्याकडेला चकण्यावरून वाद सुरू होता. परंतु पैसे देत नसल्याने शेंगदाणे - फुटाणे विक्रेता त्याला देत नव्हता. त्यावरून दोघांची हमरीतुमरी झाली. त्याच वेळी दारुड्याला राग आल्याने त्याने हातात असलेली पाण्याची बाटली हवेत भिरकावून दिली. ही बाटली थेट मंत्री शंभुराज देसाईच्या वाहनावर पडली. मंत्र्याच्या वाहनावर अचानक बाटली पडल्याने वाहनांचा ताफा काही वेळ तेथेच थांबला. पोलिसांच्या निदर्शनास काही बाबी आल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांचे वाहन पुढे पाठवले व एक पोलिस व्हॅन तेथेच थांबली. लिसांच्या चांगलेच तोंडचे पाणी पळाले आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल
पोलिसांनी तातडीने नम्या यंत्र्या भोसले यास ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता सातारा पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात घातपात करण्याचा प्रयत्न होता का?, याचाही तपास करण्यात येणार आहे.
तानाजी सावंतांच्या ताफ्याला अपघात
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्याचा (Accident in the convoy of Health Minister Tanaji Sawant) कोल्हापुरात (Kolhapur News) अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
हे ही वाचा :