एक्स्प्लोर

Phaltan Doctor death: 'तो मी नव्हेच' म्हणणाऱ्या निंबाळकरांचा फलटणमधील डॉक्टर तरूणीच्या प्रकरणाशी संबंध; अंबादास दानवेंनी सगळंच सांगितलं, त्या दोन PAची नावंही घेतली

Phaltan Doctor death: 'तो मी नव्हेच' म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पहा, असं म्हणत अंबादास दानवेंनी पोस्ट शेअर केली आहे.

मुंबई : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात (Satara Doctor Suicide) ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. यावरुन काही लोक गलिच्छ राजकारण करु पाहत आहेत. त्या डॉक्टर महिलेचा जीव गेला, त्या बिचारीने कशासाठी जीव दिला याचे  संशोधन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात काही झालं तरी कुठलीही दु:खद घटना घडली राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप होतात. तसंच इथं काही घडलं तरी आमच्या नावाची बदनामी करायची ही एक फलटणची अनभिषिक्त परंपरा झाली आहे. आम्ही फलटणकर याला भीक घालत नाही. भगिनीचा जीव गेल्यानंतर कोणाला यामधून राजकारण करायचं आहे तालुक्याला कळून आलं आहे. विरोधक मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार करत आहेत, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले. त्यावरती पुन्हा एकदा दानवेंनी निंबाळकरांवरती पोस्ट लिहून या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते सांगितलं आहे.

Ambadas Danve Post: दानवेंची सोशल मिडीया पोस्ट

आज मुख्यमंत्री @Dev_Fadnavis त्या माणसासोबत व्यासपीठावर बसतील ज्याने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या एका महिला डॉक्टरवर फिटनेसबाबत दबाव टाकला. 'तो मी नव्हेच' म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पहा.. 

१. मल्हारी अशोक चन्ने (४२) हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणाने टूडी इकोसाठी मृत महिला डॉक्टरने रेफर केला होता. हे रेफरल दिल्यावर खासदार साहेबांशी बोला.. असे सांगत दोन पीए या महिला डॉक्टरकडे आले होते. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने याविषयी आपल्या जबाबात पहिल्या पानावर ओळ क्रमांक  २१ ते ३१ यावर हे स्पष्ट नमूद केले आहे. 

२. याच स्टेटमेंटमध्ये खासदार महोदयांनी 'आपण बीडचे असल्याने आरोपीला 'फिट' देत नाहीत, अशी पोलिसांची कंप्लेंट आहे' असे सांगितल्याचे या महिला डॉक्टरने स्पष्टपणे नमूद केले आहे. 

३. दुसरा पुरावा म्हणजे फलटण जेएमएफसी कोर्टात दाखल झालेल्या खटल्याची माहिती सांगणारा हा फोटो. वरील आरोपी चन्ने याच्या विरोधात स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल लिमिटेड, उपळवे या कंपनीने दावा दाखल केला होता. ज्याचा Filing number SCC/2433/2024 तर  Case Registration Number SCC/1883/2024 हा आहे. ही  स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल कंपनी निंबाळकर यांच्या मालकीची आहे, हे निंबाळकर यांच्या प्रोफाईलवरच नमूद आहे. 

४. महिला डॉक्टरला फोनवरून बोलणे करून देणारे दोन पीए म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटीळे! 

आता एवढं दिल्यावर तापास करणाऱ्या पोलिसांनी हे पण सांगावे की डीवायएसपी राहुल धस आणि पी आय अनिल महाडिक यांचा यात काय सहभाग होता! नाहीतर मला हे सांगावं लागेल.. 

बाकी हे महायुती सरकार चुकीची कामे करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आहेच, हे नवीन राहिलेले नाही. एका कर्तव्यदक्ष डॉक्टरची किंमत सरकारच्या लेखी काय आहे हे आज देवेंद्र फडणवीस फलटणला गेल्यावर सगळ्या महाराष्ट्राला कळणार आहेच.. 
कायद्याचे न उरले भान..देवाभाऊंच्या सरकारमध्ये महिलांचा अपमान..!", अशी पोस्ट अंबादास दानवे यांनी शेअर केली आहे. 

Satara Crime News: नेमकं प्रकरण काय?

सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर 'माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,' असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संबंधित महिला डॉक्टर फलटणमधील एका हॉटेलमध्ये राहत असलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावूनही तो उघडला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर महिलेने गळफास घेतल्याचे आढळून आले. फलटण शहर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालयातवशवविच्छेदनासाठी पाठविला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget