Satara News : महाबळेश्वर-वाई रोडवर पसरनी घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला पर्यटक अडकले
सातारा जिल्ह्यातील (Satara News) महाबळेश्वर-वाई रोडवर पसरनी घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला पर्यटक अडकले आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara News) महाबळेश्वर-वाई रोडवर पसरनी घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला पर्यटक अडकले आहेत. दुसरीकडे सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी सातारा शहर व परिसराला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शहरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. विजेचा कडकडाट व वेगवान वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. गणेश मंडळाकडून उभारण्यात आलेले भव्य-दिव्य देखावे देखील या पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे.
सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली
दुसरीकडे, सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची हुलकावणी सुरु आहे. त्यामुळे 94 गावे आणि 432 वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. पश्चिमेकडेही पर्जन्यमान तुलनेत कमी झालं आहे. आगामी काही दिवसांत पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणा होणार आहे. अन्यथा पुढीलवर्षीच्या पावसाळ्याची वाट पहावी लागणार आहे. तर सध्यस्थितीत पाऊस नसल्याने पाच तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या