बंद कंटेनरला कारची जोरदार धडक, 2 महिलांचा जागीच मृत्यू, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर (Pune Bengaluru National highway) पाचवड गावच्या हद्दीत भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. बंद पडलेल्या कंटेनरला भरधाव इनोव्हा कारने जोरदार धडक दिली आहे.

Satara Accident : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर (Pune Bengaluru National highway) पाचवड गावच्या हद्दीत भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. बंद पडलेल्या कंटेनरला साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव इनोव्हा कारने जोरदार धडक दिली आहे. यामध्ये या कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. सलमा मोमीन आणि महिदा शेख अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवले आहेत. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Solapur Accident: सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू,15 जखमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

