Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण: वैभवी आणि धनंजय देशमुख यांचे ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित; नेमकं कारण काय?
Santosh Deshmukh Murder Case: वैभवी देशमुख ( Vaibhavi Deshmukh) आणि धनंजय देशमुख यांचे हे ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी. यासह जेरबंद असलेल्या आरोपींना मदत आणि रसद पुरवणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी उद्या म्हणजेच सोमवार 16 जून रोजी आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र वैभवी देशमुख ( Vaibhavi Deshmukh) आणि धनंजय देशमुख यांचे हे ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस आणि पेरणीचा काळ असल्याने कोणालाही त्रास होऊ नये, म्हणून हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे सोमवारी होणारे ठिय्या आंदोलन तूर्तास तरी पुढे ढकलण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक मुद्यांवरून देशमुख कुटुंबिय, मस्साजोग ग्रामस्थ सोमवारी रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करणार होते. फरार आरोपी कृष्णा आंधळे ला तात्काळ अटक यासह अनेक मागण्यासाठी हे आंदोलन होणार होतं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या केज मधील मस्साजोग येथे अनेक आंदोलन करण्यात आले. आता पुन्हा एकदा देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थ सोमवारी रास्ता रोको आंदोलन करणार होते. मात्र शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस आणि पेरणीचा काळ असल्याने कोणालाही त्रास होऊ नये, म्हणून हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. तर आंदोलनाची पूढील तारीख ही पुढे ठरणार असल्याचे बोललं जात आहे.
आरोपींना मदत करणारे लोकांकडून आम्हाला धमक्या दाखवणे आणि ब्लॅकमेल करणे, असे प्रकार होत असल्याने सोमवार दि.16 रोजी देशमुख कुटुंबीय व मस्साजोग ग्रामस्थ रास्ता रोको करणार होते. याबाबतचे निवेदन केज तहसीलदार यांना देण्यात आले होते. मात्र आता हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- संतोष देशमुखांची कन्या वैभवी NEET परीक्षेत उत्तीर्ण, सुप्रिया सुळेंनी फोन करुन केलं कौतुक, किती मिळाले गुण?
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अन् भाजपची आज अत्यंत महत्वाची समन्वय बैठक; नागपुरातील बैठकीत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही हजेरी
























