एक्स्प्लोर

Sangli Crime : सांगलीमधील दोघेजण तब्बल 16 कोटींचं सोनं घेऊन फरार; उत्तर प्रदेशातील पोलिसांची टीम सांगलीत दाखल

Sangli Crime : आरोपी दोघेही मुळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. संपत शिवाजी लवटे व महेश विलास मस्के अशी या संशयितांची नावे असून पोलिसांनी त्यांचे फोटोही जारी केले आहेत.

सांगली : सांगली जिल्ह्यातील असलेल्या दोघांनी उत्तर प्रदेशातील कानपूरमधून गलाई व्यावसायिकांचे तब्बल 16 कोटींचे सोने घेऊन फरार झाले आहेत. सोन घेऊन जात असताना सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. कानपूर पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहे. दोघा संशयिताच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

कानपूर पोलिसांची टीम आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात दाखल

आरोपी दोघेही मुळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. संपत शिवाजी लवटे व महेश विलास मस्के अशी या संशयितांची नावे असून पोलिसांनी त्यांचे फोटोही जारी केले आहेत. संपत हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बामणी गावचा आणि महेश हा पलूस तालुक्यातील नागराळे गावचा आहे.  सांगली पोलिसांच्या मदतीने सोने घेऊन पळालेल्या दोघांचा शोध घेतला जात असून अद्याप दोघाचा थांगपत्ता लागला नाही. कानपूर पोलिसांची एक टीम आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहे. सध्या या दोघा संशयितांच्या  कुटुंबातील सदस्यांची कानपूर पोलिस आणि स्थानिक पोलिस चौकशी करत आहेत. 

सोने घेऊन जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. कानपूर पोलिसांनी याबाबत तातडीने तपास यंत्रणा लावली असून सांगली जिल्ह्यात तळ ठोकला आहे. विट्यातूनही याबाबतचा तपास सुरु असून चोरी करणारे संशयित आरोपी हे  हे आरोपी फरार असल्याने कानपूर पोलिसांनी सांगली जिल्ह्यात आपली यंत्रणा लावली आहे.

बिहारच्या तुरुंगात बसून सांगलीत दरोडा

दुसरीकडे, सहा महिन्यापूर्वी पोलिसांना आव्हान देत सांगलीतील (Sangli)  रिलायन्स ज्वेलर्सवर (Reliance Jewellers)  टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला बिहारच्या पाटणामधून अटक करण्यात आलीय. सुबोध सिंह ईश्वर प्रसाद सिंह असे संशयिताचं नाव आहे. या आरोपीवर विविध ठिकाणी 32 गुन्हे दाखल आहेत. तसेच जेलमधून तो टोळी चालवत असल्याचे तपासात समोर आले होते. डेहराडून येथील रिलायन्स ज्वेलर्स चोरीच्या घटनेमागेही हेच असावेत असा संशय पोलिसांना आहे. संशयित सुबोधसिंग यास सांगलीत आणण्यात आलं आहे. त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या चौकशीमध्ये आणखी आरोपी आणि मुद्देमाल हस्तगत केले जाणार आहेत. सांगली पोलिसांनी बिहार जेलमधून या मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget