Shivjayanti 2023 : तिरुपती बालाजीमध्ये शिवजयंती साजरी; मराठा बिझनेस असोसिएशन महाराष्ट्र राज्यचा पुढाकार
सहा महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा गाडीमधून हटवल्याची घटना व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली होती. याबाबतची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी शिवजयंतीला मराठा बिझनेस असोसिएशने तिरुपती बालाजी या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला.
Shivjayanti 2023 : मराठा बिझनेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा यांच्या वतीने तिरुपती बालाजी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा गाडीमधून हटवल्याची घटना व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली होती. याबाबतची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी शिवजयंतीला मराठा बिझनेस असोसिएशने तिरुपती बालाजी या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि मूर्ती घेऊन तसेच शिवाजी महाराजांचा पाळणा गात 40 महिला, 30 पुरुष आणि 5 लहान मुले अशा 75 जणांनी मिळून तिरुपती बालाजीच्या मंदिरासमोर शिवजयंती जोरात साजरी केली.
शिवजयंती साजरी करत असताना तिरुमलात कोणताही विरोध झाला नाही अथवा कुणीही रोखले नाही. मराठा बिझनेस असोसिएशनच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि मूर्ती घेऊन तसेच पाळणा घेऊन सर्व 40 महिला, 30 पुरुष आणि 5 लहान मुले अशा 75 जणांनी मिळून शिवजयंती जोरात साजरी केली. शिवाजी महाराजांचा पाळणा गायला गेला. दुर्वा दिनेश तेंडले या पाच वर्षाच्या चिमूरडीने ध्येय मंत्र गायला.
तिरुपती देवस्थान तिरुपती भगवान शिवाय कोणत्याच गोष्टीला या प्राधिकरण आवारात कोणताही सोहळा करण्यास परवानगी देत नाही, असा जो आरोप होतो त्यात काही तथ्य नसल्याचे या माध्यमातून समोर आल्याचे मराठा बिझनेस असोसिएशनच्या सदस्यांनी या माध्यमातून सांगितलं. मध्य भारतामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज ढाल बनून उभे राहिले नसते, तर दक्षिणमध्ये एकही मंदिर शिल्लक राहिले नसते. म्हणून संपूर्ण भारतात दक्षिण मधेच शिवाजी महाराजांचे पहिले शिवमंदिर उभारले गेले आहे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मराठा बिझनेस असोसिएशनच्या सदस्यांनी भावना व्यक्त केल्या.
सदरच्या या कार्यक्रमास सांगली जिल्हा मराठा बिझनेस असोसिएशनचे सल्लागार संदीप पाटील, एमबीए सोशल मीडिया प्रमुख अक्षय साळुंखे, केशव पाटील, अशोक मगदूम, अजिक्य पाटील, अनिकेत पाटील, आकाश पाटील, सारंग पाटील, विष्णू पाटील, आर्मी मॅन कृष्ण पाटील, माधव मराठे, विकास बेरा, तानाजी पाटील, विशाल पाटील, सागर पाटील, सचिन कदम, रोहित पवार, अमोल निकम अक्षय मोरे, आकाश देसाई, निलेश लबाजे, दिनेश तेंडले, आदित्य पाटील, मंथन भोसले, श्वेता माने, माधवी मराठे, स्नेहा नलावडे, गौरी पाटील, शीतल पाटील, पार्थ पाटील, प्रणाली पाटील, संगीता पाटील, सुनीता पाटील, जानवी निकम, सुनंदा कदम, अर्चना कदम, इतर मराठा बिझनेस असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
महत्वाच्या इतर बातम्या :