Sangli News : भिर्रर्रर्र... बकासूर-महिब्यानं मैदान मारलं; पटकावला रुस्तूम-ए-हिंदचा मान अन् थार कार
Sangli News : सांगलीच्या भाळवणी येथे देशातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली. या शर्यतीत पुण्याच्या मुळशीमधील बकासूर आणि कराडच्या रेठरेमधील महीब्या बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावला.
Sangli News : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीनं सांगलीच्या (Sangli News) विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैलगाडी शर्यतीत (Bailgada Sharyat) पुण्याच्या मुळशीमधील बकासूर आणि महीब्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली. अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अशा या बैलगाडा शर्यती पार पडल्या. या बैलगाडा शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील 2 लाखांहून अधिक बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती.
सांगलीच्या भाळवणी येथे देशातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली. या शर्यतीत पुण्याच्या मुळशीमधील बकासूर आणि कराडच्या रेठरेमधील महीब्या बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावला. या बैलजोडीला चक्क थार गाडी भेट म्हणून देण्यात आली आहे. लाखो बैलगाडा शौकिनाच्या उपस्थितीत सांगलीच्या भाळवणी येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अशा या बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रभरातील 2 लाखांच्या आसपास बैलगाडा शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती.
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीनं सांगलीच्या विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे 10 एकर परिसरातील माळरानावर ऐतिहासिक बैलगाडी स्पर्धा पार पडल्या. ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, मुंबई आणि कर्नाटक राज्यातून सुमारे 200 बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले होते.
पाहा व्हिडीओ : Sangli Bailgada Sharyat : सांगलीत बैलगाडा शर्यतीचा थरारा, बकासुर बैलजोडीनं जिंकली 'थार'
देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडी शौकीनांनी हजेरी लावली होती. तसेच या बैलगाडा शर्यत मैदानासाठी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार निलेश लंके, माजी आमदार पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदि मान्यवरांनीही उपस्थितीत लावली होती. तर देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये थार गाडी कोण जिंकणार? याकडे लाखो बैलगाडी शौकिनांच्या नजरा खिळल्या होत्या.
वेगवेगळ्या गटातून पार पडलेल्या शर्यतीनंतर चुरशीच्या अंतीम सामन्यात पुण्याच्या मुळीशी येथील मोहिल शेठ धुमाळ यांच्या बकासूर आणि कराडच्या सदाशिव कदम यांच्या महीब्या बैलजोडीनं मैदान मारत थार गाडी पटकावली. या विजयानंतर बैलागाडी शौकिनांनी मैदानात एकच जल्लोष केला. तर थरारक अशा पार पडलेल्या शर्यतींमध्ये पुण्याच्या वाघोलो येथील सुमित भाडळे, अमित भाडळे आणि आदिक घाडगे यांच्या शंभू आणि नांदेड सिटी पुण्याच्या-पुणे जीवन देडगे यांच्या रोमन बैलजोडीनं द्वितीय क्रमांक तर डोंबिवली येथील गुडीरतन म्हात्रे यांच्या बैलजोडीनं तिसरा क्रमांक मिळवत ट्रॅक्टर पटकावला आहे. त्यासोबत इतर सात विजेत्यांना दुचाकी बक्षीस म्हणून देण्यात आल्या. या विजेत्यांना खासदार श्रीनिवास पाटील, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हस्ते थार गाडी आणि दुचाकी देऊन गौरवण्यात आलं.