एक्स्प्लोर

Gopichand Padalkar : शरद पवार आणि त्यांच्या नातवाचा बुरखा देवेंद्र फडणवीसांनी फाडला, दोघं मिळून राज्यात विष कालवतायत; गोपीचंद पडळकरांची टीका 

शरद पवार आणि त्यांचा नातू (रोहित पवार) हे महाराष्ट्रात फिरून विद्यार्थ्यांमध्ये विष कालवत होते, त्यांचा हा बुरखा फाडून त्यांना फडणवीसांनी चपराक लावल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

सांगली : कंत्राटी भरतीवरून ज्या पद्धतीने वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू होता. त्यांचा तो प्रयत्न आणि बुरखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडून टाकला आहे, कंत्राटी भरतीचा जीआर महाविकास आघाडीच्या काळात काढण्यात आला होता, शरद पवारांच्या (Sharad Pawar) सल्ल्याने त्यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या सहीने काँग्रेसच्या मदतीने हा जीआर काढला होता, त्यांचं पितळ सर्व आता उघडं पडलं आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. 

मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या तयारीत आमचं सरकार

शरद पवार आणि त्यांचा नातू (रोहित पवार) हे महाराष्ट्रात फिरून विद्यार्थ्यांमध्ये विष कालवत होते, त्यांचा हा बुरखा फाडून त्यांना फडणवीसांनी चपराक लावल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.  गोपीचंद पडळकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने प्रयत्न करत आहेत. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या तयारीत आमचं सरकार आहे, ओबीसी आरक्षण सध्या 16 टक्के आहे. जर पुन्हा मराठा समाजाला या ओबीसीमधून आरक्षण दिलं तर मराठा समाजाला काय मिळणार आहे असे ते म्हणाले. 

धनगर समाजाने आता आरक्षणाच्या लढाईसाठी तयार राहायला पाहिजे 

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्याकडून उद्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीच्या बिरोबा बनात दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. धनगर समाजाने आता आरक्षणाच्या लढाईसाठी तयार राहायला पाहिजे हे आवाहन या दसरा मेळाच्या माध्यमातून करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले. 

पडळकरांच्या दसरा मेळाव्याकडे लक्ष 

या मेळाव्यातून पडळकर धनगर आरक्षणाच्या मागणीसह अन्य समाजातील आरक्षणाच्या भूमिका स्पष्ट करणार आहेत. यामुळे पडळकर यांच्या या दसरा मेळाव्याकडे सध्या लक्ष लागलं आहे. लाखो जन या मेळाव्यासाठी येतील अशा अनुषंगाने बिरोबा बनामध्ये या दसरा मेळाव्याच्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पडळकर यांनी महाराष्ट्रभर जागर यात्रा देखील काढायला सुरुवात केली आहे. त्यातील पहिला टप्पा पडल्याने पूर्ण केला आहे. मात्र, आता दसरा मेळाव्याच्या माध्यमातून ते कोणती भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget