(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : फास्टफूड नको आई, मला भाकरी हवी डब्यात; सांगली जिल्ह्यातील बोरगाव झेडपी शाळेत साजरा होतो 'भाकरी डे'
मुलांनी भाजी, भाकरीसारखा पौष्टिक आहार खाण्यासाठी आवड निर्माण व्हावी यासाठी 'भाकरी डे' राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी भाकरी डे साजरा करण्यात येतो.
सांगली : सध्या लहान मुलांमध्येही फास्टफूडचे वेड वाढल्याने शहरापासून आता ग्रामीण भागातही नुडल्स, पिझ्झा, बर्गरसाठी हट्ट सुरु झाला आहे. ही पालकांसाठी आणि मुलाच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे. मुलांच्या जेवणातून किंवा डब्यातून भाजी, भाकरी गायब असल्याचे चित्र आहे, पण याच भाकरीची ओढ लागावी आणि फास्टफूडपासून मुले दूर जात राहावीत यासाठी एका जिल्हा परिषद शाळेकडून मुलांना पौष्टिक खाद्याची सवय लागावी, यासाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे.
आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी भाकरी डे साजरा करण्याचा निर्णय
तासगाव तालुक्यातील बोरगावमधील (Borgaon) जिल्हा परिषद शाळेत आठवड्यातील एक दिवस या सर्वांच्या मुलाच्या डब्यात एकच मेनू असतो. तो म्हणजे भाजी भाकरी. मुलांनी भाजी, भाकरीसारखा पौष्टिक आहार खाण्यासाठी आवड निर्माण व्हावी यासाठी 'भाकरी डे' राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी भाकरी डे साजरा करण्यात येतो. 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्ताने मुलांना पौष्टिक खाद्याची सवय लागावी, यासाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविला जातो. या शाळेत आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी भाकरी डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. दोन आठवड्यांपासून उपक्रम सुरू झाला आहे.
शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका नीता घाटगे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक मंगळवारी कौतुक होत आहे. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्ताने मुलांना पौष्टिक खाद्याची सवय लागावी, यासाठी आगळावेगळा उपक्रम राबविला. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी भाकरी डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. विद्याथ्र्यांसह पालकांच्यात जनजागृती केली. शाळेत भाकरी डे सुरु झाला. प्रत्येक मंगळवारी सर्वच मुले डब्यातून भाकरी आणतात.
'फास्टफूड नको आई, मला भाकरी हवी डब्यात'
फास्टफूड खाण्याचे प्रमाण वाढल्यानं हा उपक्रम राबवताना शिक्षकांनी पालकांना देखील सक्ती केली. सर्वांशी चर्चा करुन मंगळवार ठरवण्यात आला आणि मंगळवारी शाळेतील विद्यार्थी देखील शाळेला जाताना, डब्यात आईकडून भाजी भाकरी मागून घेत आहेत असे पालक सांगतात. भाकरी खायची म्हटले की नाक मुरडणारी मुलं देखील आता चवीने भाकरी खातात. पारंपरिक पौष्टिक खाद्याला फाटा देत शाळेच्या डब्यात फास्टफूडसाठी आग्रह धरणारी मुलं सर्वत्रच पाहायला मिळतात. मात्र तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, 'फास्टफूड नको आई, मला भाकरी हवी डब्यात' असाच आग्रह धरताना दिसून येतात.
इतर महत्वाच्या बातम्या