Sangli News : आंबेडकरी समाजातील 800 लोकांनी गाव सोडलं, बेडगच्या सरपंच, ग्रामसेवकास झेडपीकडून नोटीस, सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश
Sangli News : आंबेडकरी समाजाकडून सुरेखा कल्लाप्पा कांबळे व इतरांनी बेडग येथील डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर कमान पाडल्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.
Sangli News: सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान अतिक्रमण समजून ग्रामपंचायतीने केलेली कारवाई सदोष असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले आहे. याप्रकरणी सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकास ग्रामपंचायत अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आली आहे.
खुलासा प्राप्त होताच योग्य त्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार
चौकशी अहवालानुसार अतिक्रमणामध्ये केलेली कारवाई ही ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 52 (2अ) व 53 (1) या नियमानुसार सदोष असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत सरपंच व सर्व कार्यकारिणी तसेच तत्कालीन आणि विद्यमान ग्रामविकास अधिकारी यांना नोटीस बजावण्याची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे. नोटिशीवर सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी करण्यात निखिल ओसवाल यांनी आज दिले आहेत. खुलासा समर्पक न वाटल्यास ग्रापं अधिनियम कलम 39 (1) अन्वये सभागृह अपात्रतेची कार्यवाही प्रस्तावित केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. ग्रामविकास अधिकारी यांनी सचिवाची कर्तव्ये व्यवस्थित न बजावल्यामुळे त्यांच्या विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत नोटीस देऊन खुलासा मागवण्यात आला आहे. खुलासा प्राप्त होताच योग्य त्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
आंबेडकरी समाजाकडून सुरेखा कल्लाप्पा कांबळे आणि इतरांनी बेडग येथील डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर कमान पाडल्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या प्रकरणी चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांची नियुक्ती केली होती. डॉ. लोखंडे यांनी मिरजेचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यासोबत बेडग येथे समक्ष जाऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.
कारवाई सदोष असल्याचे स्पष्ट
डॉ. आंबेडकर कमान प्रकरणी आलेल्या तक्रारीतील मुद्यांनुसार सरपंच उमेश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली होती. आवश्यक कागदपत्रांची छाननी करून त्यांच्या छायांकित प्रती घेतल्या आहेत. दरम्यान, ही कारवाई सदोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबतचा चौकशी अहवाल प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल यांना सादर करण्यात आला होता.
ओसवाल यांनी बेडग सरपंच उमेश पाटील, ग्रामसेवक आणि सदस्यांशी मंगळवारी चर्चा केली. ओसवाल यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानुसार लोखंडे यांनी मिरजेचे गटविकास अधिकारी यांच्यासह बेडगला 12 जुलैला भेट देऊन ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली. अहवालानुसार अतिक्रमणामध्ये केलेली कारवाई नियमांनुसार सदोष असल्यामुळे सरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकाऱ्यांना नोटीस काढून सात दिवसांत खुलासा करण्याची सूचना दिली आहे. खुलासा समाधानकारक न आल्यास ग्रामपंचायत कारवाई करण्यात येणार व आहे. ग्रामविकास अधिकारी यांनी कर्तव्य व्यवस्थित न बजावल्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याबाबत नोटीस दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या