Vishal Patil : ही लढत फक्त विशाल पाटील आणि दंडूकशाही करणाऱ्या संजय पाटलांविरोधात; विशाल पाटलांनी दंड थोपटले
विशाल पाटील यांना लिफाफा चिन्ह मिळालं आहे. चिन्ह निश्चित झाल्यानंतर विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. शेवटच्या घटकांपर्यंत विश्वजीत कदम यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले.
सांगली : आमची लढाई ही स्वार्थासाठी नसून काँग्रेस पक्षासाठीच आहे आणि या काँग्रेस पक्षाच्या विचारांचाच खासदार सांगलीमध्ये (Sangli Loksabha) निवडून येईल, सांगलीमध्ये तिरंगी लढत होत नसून ही लढाई फक्त विशाल पाटील आणि दंडूकशाही करणाऱ्या संजयकाका पाटलांच्या विरोधातच होणार असल्याचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी म्हटलं आहे. विशाल पाटील यांनी सांगलीमधून बंडखोरी कायम ठेवताना अर्ज माघार घेतलेला नाही.
उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी अनेकांचे फोन आले
विशाल पाटील यांना लिफाफा चिन्ह मिळालं आहे. चिन्ह निश्चित झाल्यानंतर विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. शेवटच्या घटकांपर्यंत आमदार विश्वजीत कदम यांनी आपल्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. चंद्रहार पाटील यांच्या माघारीसाठी आज 22 एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंत मदत केल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. माझा उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी अनेकांचे फोन आले. वेगवेगळी पदे देण्यासाठी ऑफर आल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की मला पदे नको होती. माझी उमेदवारी जनतेची आहे आणि जनतेनेच आज उमेदवार दिल्याचे विशाल पाटील म्हणाले. सांगलीमधील काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता माझ्या मागे उभा असल्याचे ते म्हणाले. आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यामध्ये आणखी सुद्धा वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपचा पाडाव आम्हीच करू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सांगलीचा खासदार सांगलीकरच ठरवतील
ते म्हणाले की काँग्रेसचे चिन्ह हद्दपार करण्याचं काम काहींनी केलं. काँग्रेस पक्षाचा विचाराचा खासदार लिफापा चिन्हावर निवडून देतील आणि सांगलीचा खासदार सांगलीकरच ठरवतील असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशाल पाटील यांनी पुढे सांगितले की, 16 एप्रिल रोजी अर्ज भरला. जाहीर सभेमध्येच अर्ज माघार घ्यायचा नाही असा निर्धार केला होता. आम्ही माघार घेणार नव्हतो, काँग्रेसने एबी फॉर्म द्यावा अशी अपेक्षा होती असे पाटील म्हणाले. शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म आला नाही याच दुःख वाटल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मला अपेक्षा होती की मविआचा अधिकृत उमेदवार मीच होईल. मात्र, काही मविआमधील घटकानी कोणत्याही न कळणाऱ्या कारणासाठी उमेदवारी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या