एक्स्प्लोर

Sangli Crime : मिरजमध्ये दुधामध्ये भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑईल व पावडरचा साठा जप्त

Sangli : सुहास अंकुश कुंडले यांच्या राहत्या घराची तपासणी करून दुधामध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे रिफाईन्ड पामोलिन ऑईल व व्हे पावडरचा साठा जप्त करून ताब्यात घेत मिक्स दुधाचा साठा नष्ट केला.

Sangli Crime : सांगली जिल्ह्यात (Sangli News) अन्न व औषध प्रशासन विभागाने मिरज तालुक्यातील जानराववाडीमध्ये छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. सुहास अंकुश कुंडले यांच्या राहत्या घराची तपासणी करून दुधामध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे रिफाईन्ड पामोलिन ऑईल व व्हे पावडरचा साठा जप्त करून ताब्यात घेत मिक्स दुधाचा साठा नष्ट केला. अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न)  नि. सु. मसारे यांनी ही माहिती दिली. 

या कारवाईत 5 हजार 877 रूपये किंमतीचे 38 किलो रिफाईन्ड पामोलिन ऑईल, 23 हजार 944 रूपये किंमतीची 146 किलो  व्हे पावडर व 320 रूपये  किंमतीचा 8 लिटर मिक्स दुधाचा साठा आढळला. दुध व्यवसायिकाकडून सर्व अन्न पदार्थ व भेसळकारी पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेवून उर्वरीत साठा जप्त करण्यात आला. सदर ठिकाणी बाजूच्या प्रद्युम्न खोत यांच्या घरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधित तंबाखू 200 ग्रॅमचे 507 बॉक्स (किंमत 41 हजार 320 रूपये) साठा आढळल्याने सदरचा साठा जप्त करून ताब्यात घेण्यात आला. खोतविरोधात मिरज ग्रामिण पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 

ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. मसारे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे, श्रीमती हिरेमठ, स्वामी व नमुना सहायक कवळे यांच्या पथकाने केली. नागरिकांना अन्न भेसळीबाबत कोणतीही माहिती असल्यास त्यांनी अन्न औषध प्रशासन सांगली कार्यालयाशी 0233-2602202 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा राज्यस्तरीय टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन मसारे यांनी केले आहे. 

बेदाण्याला चकाकी येण्यासाठी चक्क डिटर्जेंट पावडरचा वापर

दुसरीकडे, मार्च महिन्यात सांगलीमध्येच बेदाण्याला चकाकी येण्यासाठी चक्क डिटर्जंट पावडरचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत 7 लाख 63 हजाराचा बेदाणा जप्त केला होता. कुपवाड एमआयडीसीमधील मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन, मे. बाबा ड्राय फ्रुटस आणि मे. चौगुले ट्रेडिंग या तीन बेदाणा वॉशिंग आणि रिपॅकिंग सेंटरची तपासणी करत असताना हा प्रकार समोर आला होता. जिल्ह्यामध्ये सध्या बेदाणा उत्पादनाचा कालावधी असल्याने बरीच नवीन बेदाणा वॉशिंग, रिपॅकिंग सेंटर कार्यरत झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे आणि स्वामी यांच्या पथकाने कुपवाड एमआयडीसी येथील काही पेंढ्यावर छापे टाकले. या तपासणी दरम्यान या पेढ्यांना परवाना नसल्याचे आणि वॉशिंग सेंटरमध्ये अस्वच्छता असल्याचे आढळले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget