एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sangli Crime : नात्याचा मुडदा पाडला! प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनी स्वत:च्या वृध्द आजीला टॉवेलने गळा आवळून संपवलं; सांगलीत थरकाप

संपत्तीच्या वादातून नातवांनी स्वत:च्या वृध्द आजीचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याची घटना खानापूर तालुक्यातील पारेमध्ये घडली. सखुबाई संभाजी निकम (वय 80) असे मृत झालेल्या दुर्दैवी आजीचे नाव आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) संपत्तीच्या वादातून रक्ताच्या नात्याचा मुडदा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून नातवांनी स्वत:च्या वृध्द आजीचा टॉवेलने गळा आवळून खून (Grandchildren Strangled Grandmother with a Towel) केल्याची घटना खानापूर तालुक्यातील पारेमध्ये घडली. सखुबाई संभाजी निकम (वय 80) असे मृत झालेल्या दुर्दैवी आजीचे नाव आहे. पोलिसांनी (Sangli Police) आजीच्या एका अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष सतीश निकम, सून रेणुका सतीश निकम या तिघांना अटक केली आहे. 

चिंचणी येथील सतीशशेठ निकम यांचा सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. त्यांची विटा, चिंचणी (मं.) यासह विविध ठिकाणी प्रॉपर्टी आहे. यातील अर्धा हिस्सा सतीश यांचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्यासाठी त्यांची पारे येथील बहीण संगिता रामचंद्र साळुंखे यांनी भाऊ सतीश यांना सांगितले होते. त्याचा राग संशयित नातू आशिष, त्याचा अल्पवयीन भाऊ व सून रेणुका यांना होता.

आतीच्या घरी जाऊन आजीचा गळा दाबला

हा राग मनात धरून संशयित तिघांनी 19 फेब्रुवारी रोजी संगीता साळुंखे यांच्या पारे गावातील घरी जाऊन त्यांना तू तूझ्या भावाला बोलावून घेऊन 48 तासांच्या आत सदरची प्रॉपर्टी फिरवून दे, नाहीतर तुला व म्हातारीला (सखुबाई) यांना 48 तासानंतर दाखवितो, अशी धमकी देऊन हे तिघेही विट्याला निघून गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हे तिघेही सतीश यांची बहीण संगिता यांच्या पारे येथील घरी गेले. त्यावेळी सखुबाई या मुलगी संगिताच्या घरी होत्या. या तिघांनी पुन्हा त्याठिकाणी वाद घालण्यास सुरूवात केली. 

त्यानंतर आजी सखुबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद करून त्यांचा टॉवेलने गळा आवळून खून केला. त्यानंतर हे तिघेही संशयित त्यांच्या विटा येथील घरी आले. या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक विपुल पाटील, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून सखुबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. 

याप्रकरणी विटा पोलीसांनी मयत सखुबाई यांचा अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष, सून रेणुका निकम या तिघांना रात्री उशिरा अटक केली. या घटनेची विटा पोलीसांत नोंद झाली असून पोलीस निरीक्षक शरद मेमाणे पुढील तपास करीत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Ajit Pawar Meeting : अजित दादांचं 'ते' वक्तव्य; रोहित पवारांची कबुलीTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Embed widget