एक्स्प्लोर

Sangli Crime : उत्तर प्रदेशात तीन गलाई व्यावसायिकांचा 16 कोटींच्या सोन्यावर डल्ला, पण थरकाप उडाला सांगलीत; एसआयटीकडून पलूस, खानापुरात कसून तपास

Sangli Crime : आरोपी देश सोडून पळून जाऊन नये, यासाठी त्यांची छायाचित्रे मुंबई आणि लखनौ विमानतळावर देण्यात आली आहेत. नेपाळ सीमेवरही आरोपींविरोधात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सांगली : उत्तर प्रदेशातील कानपूर येथून सांगली जिल्ह्यातील तीन गलाई व्यवसायिक सोनं 16 कोटींचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कानपूर पोलिसांचे विशेष पथक सांगली जिल्ह्यात तळ  ठोकून आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेनंतर गलाई व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तब्बल साडेतीन किलो सोनं घेऊन फरार झालेल्या गुन्ह्यामध्ये संपतराव लवटे, महेश मस्के आणि एक अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी कानपूर पोलिसांसह (Kanpur Police) सांगली पोलिस सुद्धा करत आहेत. दरम्यान, आणखी एक उत्तर प्रदेश पोलिसांची टीम दाखल झाली आहे. दोन संशयित तरुणांच्या गावाकडील कुटूंबाची कसून चौकशी सुरु आहे. 

खानापूर आणि पलूस तालुक्यात कसून चौकशी 

दरम्यान हे तिघेजण देश सोडून पळून जाऊन नये, यासाठी त्यांची छायाचित्रे मुंबई आणि लखनौ विमानतळावर देण्यात आली आहेत. नेपाळ सीमेवरही आरोपींविरोधात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कानपूर पोलिसांचे विशेष पथक खानापूर आणि पलूस तालुक्यात कसून चौकशी करत आहे.  दरम्यान कानपूरसारख्या घटनांमुळे गलाई व्यावसायिकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या घटनांचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात विटामधील नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक आणि अध्यक्ष सतीश साळुंखे, स्थानिक अध्यक्ष गणपतराव बुडाले आणि उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल 16 कोटींचे दागिने चोरीला गेल्याने सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे. 

कानपूर येथील पोलिसांचे विशेष पथक चौकशीसाठी दाखल

सांगली जिल्ह्यातील पलूस आणि खानापूर तालुक्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथील पोलिसांचे विशेष पथक चौकशीसाठी दाखल झालं आहे. या पथकात तब्बल वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 11 जणांचा समावेश आहे. या पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे. दुसरीकडे पोलिस सहायुक्तांच्या सूचनेनुसार एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटी नेतृत्व एसीपी सीमा माऊवेता कुमार करत आहेत. 

साडेतीन किलोहून अधिक सोनं घेऊन तिघेही पसार

दरम्यान, या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील कानपूर येथील बेकनगंज सरापी बाजारात संपतराव लवटे हा गलाई व्यवसायिक आहे. जुन्या सोन्याची दागिने वितळवण्यासाठी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून बेकनगंज आणि परिसरातील सर्व व्यावसायिक आपलं सोनं संपतराव शिवाजी लवटेला देतात. लवटेसह अन्य महेश विलास मस्के आणि अन्य व्यक्ती सोनं गाळणीचे काम करतात. 

शुक्रवारी 1 डिसेंबर पासून त्यांच्याकडे गाळणीसाठी आलेलं साडेतीन किलोहून अधिक सोनं घेऊन हे तिघेही पसार झाले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर कानपूरपासून ते पार सांगलीपर्यंत हा तपास सुरु आहे. संपतराव लवटे याचं कुटुंबं कानपुरात बिरहाण रोड येथील नीलवल्ली गल्लीत भाड्याच्या घरात राहत होतं. त्याचं बेकनगंजमध्ये एस आर गोल्ड टेस्टिंग नावाचे दुकान आहे.  हे दोघेही सध्या फरार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, 1297 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान, बळीराजा हवालदिल
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, 1297 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान, बळीराजा हवालदिल
'त्यांच्यासोबत रोमान्स किंवा लैंगिक संबंध अजिबात ठेवायचे नाहीत, जर ठेवल्यास...'! अमेरिकेनं कोणासाठी काढला नवा फतवा?
'त्यांच्यासोबत रोमान्स किंवा लैंगिक संबंध अजिबात ठेवायचे नाहीत, जर ठेवल्यास...'! अमेरिकेनं कोणासाठी काढला नवा फतवा?
Manoj Kumar Passes Away: बॉलिवूडचा 'भारत कुमार' काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन
बॉलिवूडचा 'भारत कुमार' काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन
भीषण अपघात! नादुरुस्त उभ्या ट्रकवर भरधाव आयशर टेम्पो अन् कार आदळली; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर, औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना  
भीषण अपघात! नादुरुस्त उभ्या ट्रकवर भरधाव आयशर टेम्पो अन् BMW कार आदळली; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08 AM 04 April 2025Ramdas Athawal : The Waqf (Amendment) Bill : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सादर केली कविताABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 04 April 2025Naxalwadi Special Report : नक्षलींकडून शांततेचा प्रस्ताव,शस्त्रसंधीची भाषा; भूमिकेचं कारण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, 1297 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान, बळीराजा हवालदिल
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, 1297 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान, बळीराजा हवालदिल
'त्यांच्यासोबत रोमान्स किंवा लैंगिक संबंध अजिबात ठेवायचे नाहीत, जर ठेवल्यास...'! अमेरिकेनं कोणासाठी काढला नवा फतवा?
'त्यांच्यासोबत रोमान्स किंवा लैंगिक संबंध अजिबात ठेवायचे नाहीत, जर ठेवल्यास...'! अमेरिकेनं कोणासाठी काढला नवा फतवा?
Manoj Kumar Passes Away: बॉलिवूडचा 'भारत कुमार' काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन
बॉलिवूडचा 'भारत कुमार' काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन
भीषण अपघात! नादुरुस्त उभ्या ट्रकवर भरधाव आयशर टेम्पो अन् कार आदळली; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर, औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना  
भीषण अपघात! नादुरुस्त उभ्या ट्रकवर भरधाव आयशर टेम्पो अन् BMW कार आदळली; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर 
मोठी बातमी! संजय राऊत राज्यसभेत भिडले, पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत
मोठी बातमी! संजय राऊत राज्यसभेत भिडले, पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत
Venture Debt : भारताच्या स्टार्टअप्सनी 1.23 अब्ज डॉलरचा निधी मिळवला, स्ट्राइड वेंचर्सच्या रिपोर्टमध्ये मोठा दावा
भारताच्या स्टार्टअप्सनी 1.23 अब्ज डॉलरचा निधी मिळवला, स्ट्राइड वेंचर्सच्या रिपोर्टमध्ये मोठा दावा
पुण्यात हॉस्पिटलने माणूसकी सोडली, जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला; आमदाराची पोलिसांत धाव, चौकशी सुरू
पुण्यात हॉस्पिटलने माणूसकी सोडली, जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला; आमदाराची पोलिसांत धाव, चौकशी सुरू
Video: बीडप्रमाणेच माझ्याबाबतही कट रचला, पण मी वाचलो; मोबाईलमध्ये आजही पुरावे, मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
Video: बीडप्रमाणेच माझ्याबाबतही कट रचला, पण मी वाचलो; मोबाईलमध्ये आजही पुरावे, मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
Embed widget