एक्स्प्लोर

Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाड; शिवसेना ठाकरे गटाचा डावलल्याचा आरोप

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये भाजप विरोधात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली आहे. ठाकरे गटाला डावलण्यात आल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केला आहे.

Sangli Agriculture Product Market Committee : राज्यामध्ये भाजपविरोधात वज्रमुठ बांधणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये सांगलीत मात्र बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने (Sangli Agriculture Product Market Committee) बिघाड झाला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये भाजप विरोधात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली आहे. भाजप विरोधात महाविकास आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, शिवसेना उध्दव ठाकरे गटाला डावलण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीवर सडकून टीका देखील करण्यात आली आहे. 

18 अर्ज माघार घेतले

महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला कोणतेही स्थान बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये देण्यात आले नाही, त्यामुळे बाजार समितीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेले 18 अर्ज माघार घेऊन महाविकास आघाडीच्या कारभाराचा आम्ही निषेध नोंदवल्याचं संजय विभूते यांनी जाहीर केले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आपली आघाडी नसल्याचं संजय विभूते यांनी स्पष्ट केले आहे.

अजितराव घोरपडे म्हणजे शिवसेना नाही

दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढणार असल्याचे घोषित केले होते. काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे अविनाश पाटील, मनोजबाबा शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. मात्र, ज्या ठाकरे गट म्हणून कवठेमहांकाळमधील ज्या घोरपडे गटाला दोन जागा देण्यात आलेत ते अजितराव घोरपडे म्हणजे शिवसेना नाही. घोरपडे यांनी जाहीररित्या आपण उद्धव ठाकरे गटात असल्याचे जाहीर करावं, असे आव्हान देत अजितराव घोरपडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव देत असल्याचे शिवसेना ठाकरे गटचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी माहिती दिली.

बाजार समितीच्या निवडणुकीत नऊ माजी संचालकांचे अर्ज अवैध

दरम्यान, निवडणुकीत मागील संचालक मंडळातील 9 माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरले आहेत. समितीच्या कामातील अनियमितता, अपहाराचा ठपका ठेवल्याने त्यांना अपात्रतेचा दणका बसला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी हा निर्णय दिला आहे. दोन्ही गटांकडून घेण्यात आलेल्या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. दोन्हीकडील बाजू जाणून घेतल्यानंतर बाजार समितीतील संचालकांच्या कारभारावर चौकशी अहवालातील आक्षेपामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे निर्णय यांनी नऊ माजी संचालकाचे अर्ज अवैध ठरवले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Torsekar Majha Katta | भाजप हरेल तेव्हा मोदींचं काय? मोदी भक्त भाऊ तोरसेकर 'माझा कट्टा'वरJob Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget