Sangli Accident: सांगलीत बसच्या चाकाखाली चिरडून 21 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; भीषण अपघातानंतर स्थानिकांचा संताप
एस्टीचे मागील चाक तरुणीच्या डोकयावरून गेल्याने शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

Sangli Accident: राज्यातील अपघातांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल रोडवर मंगळवारी सकाळी दुचाकीवरून महाविद्यालयाकडे निघालेल्या एका विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला. एसटी बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शर्वरी राजकुमार कुलकर्णी (वय 21, रा. हरिपूर) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. या भीषण अपघातानंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
नेमकं घडलं काय?
सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर बसच्या चाकाखाली येऊन सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहरातील जयमातृभूमी व्यायाम मंडळासमोर 10.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात एस्टीचे मागील चाक तरुणीच्या डोकयावरून गेल्याने शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला.
मृत शर्वरी कुलकणी ही विद्यार्थिनी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई जमखंडी बसला तिची दुचाकी घासली. यामध्ये मागील चाकखाली सापडून तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही अंतरावर जाऊन थांबली.. घटनेनंतर शर्वरी हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. यां घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे. शर्वरी हिचे वडील वारले आहे. तिची आई आणि बहिणीसोबत ती हरिपूर येथे राहत होती.
शाळेसाठी जीवघेणा प्रवास, यशोदा नदीच्या पुरात तीन विद्यार्थी अडकले
वर्ध्यात देवळी तालुक्यातील डिगडोह येथे यशोदा नदीला (River) पूर आल्याने तीन शाळकरी विद्यार्थी (School) पाण्यात अडकले आहेत. वाहत्या पुराच्या पाण्यामुळे तिघेही पाण्याने वेढलेल्या उंच ठिकाणी थांबून राहिले. याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच नगरपालिका (Wardha)आपत्ती व्यवस्थापक पथकाला पाचारणही करण्यात आले. त्यानंतर, पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. सुदैवाने विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. तिघेही शाळेतून परत येत असताना अचानक पाणी वाढले, तर यशोदा नदीच्या जवळ पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पाणी पातळी वाढली होती.
हेही वाचा
Beed Accident: बीडमध्ये भीषण अपघात, हेल्मेटची क्लिप घुसून प्राध्यापकाचा मृत्यू; दुचाकी हायवावर आदळली























