samadhan maharaj sharma : महाराजांसाठी काय पण! पाच तास उशीर होणार असल्याने फक्त 55 मिनिटांत आयोजकांनी हेलिकॉप्टरने कीर्तनासाठी आणले
बीड जिल्ह्यातील केजमधील प्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज शर्मा (samadhan maharaj sharma kirtan) यांना पाच तास उशीर होणार असल्याचे समजताच भाविकांनी हेलिकॉप्टर सोय करून सुखद धक्का दिला.
samadhan maharaj sharma : बीड जिल्ह्यातील केजमधील प्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज शर्मा (samadhan maharaj sharma kirtan) यांना पाच तास उशीर होणार असल्याचे समजताच भाविकांनी हेलिकॉप्टर सोय करून सुखद धक्का दिला. पाच तासांचा प्रवास अवघ्या 55 मिनिटात झाल्याने महाराष्ट्रात समाधान महाराजांची हेलिकॉप्टर 'वारी' चांगलीच चर्चेत आहे. सांगलीतील कथा झाल्यानंतर 55 मिनिटांमध्ये पुण्यातील वाघोलीकडे हेलिकॉप्टरने महाराजांनी प्रवास केला. (Samadhan Maharaj was brought by helicopter)
महाराजांना काही करून कीर्तनासाठी घेऊन यायचे असा चंगच वाघोलीमधील भक्तांनी बांधला होता. त्यामुळे आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेत केज येथील कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना 55 मिनिटांत वाघोलीला हेलिकॉप्टरने आणत भाविकांना सुखद धक्का दिला. सांगलीमधील रामकथा सोडून महाराजांना दोन तासांमध्ये पुण्यातील वाघोलीत कीर्तनासाठी येणे अशक्य होते.
नेमका काय प्रसंग घडला?
ह.भ.प. समाधान महाराज शर्मा (Samadhan Maharaj) यांचा सांगलीमध्ये रामकथनाचा कार्यक्रम सुरु आहे. तथापि, महाराजांना पुण्यातील वाघोलीमध्ये कीर्तन (Wagholi) कार्यक्रमाचे सुद्धा निमंत्रण होते. मात्र, सांगलीतून वाघोलीला जाण्यासाठी पाच तासांचा अवधी लागणार होता. दुसरीकडे सांगलीमधील रामकथन गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संपणार होते. त्यामुळे आयोजकांनी नामी शक्कल लढवत सांगली ते वाघोली आयोजकांनी समाधान महाराजांसाठी थेट हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. त्यामुळे समाधान महाराज फक्त 55 मिनिटांमध्ये कीर्तनासाठी वाघोलीत पोहोचले. हेलिकॉप्टरमधून नियोजित कार्यक्रमस्थळी दाखल होताच जोरदार स्वागत करण्यात आले.
राजकीय नेत्यांकडून सभा तसेच दौऱ्यांसाठी वेळेच्या बचतीसाठी हेलिकॉप्टरचा वापर हा सामान्य असला, तरी कीर्तनासाठी महाराजांना केलेली हेलिकॉप्टरची व्यवस्था चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. यानिमित्ताने महाराजांना हेलिकॉप्टर वारी झाली. आयोजकांनी केलेल्या सोयीमुळे समाधान महाराज चांगलेच भारावून गेले. त्यांनी आयोजकांचे आभार मानले. वारकरी संप्रदायाप्रती त्यांची निष्ठा दिसून येत असल्याचे समाधान महाराज म्हणाले.
दरम्यान, गुरुवारी सकाळी सांगलीत रामकथा सोहळ्याच्या निमित्ताने सांगली शहरातून निघालेल्या भव्य शोभयात्रेत समाधान महाराज सहभागी झाले. यानंतर या सोहळ्यात दुपारी दोन ते अडीचपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर ते 4 वाजता हेलिकॉप्टरने वाघोलीसाठी रवाना झाले. दुसरीकडे महाराज आज सांगलीत रामकथनाच्या सोहळ्यात सहभागी होतील.
इतर महत्वाच्या बातम्या