एक्स्प्लोर

... तर आम्ही नोटांमधे खेळलो असतो, हनी ट्रॅपप्रकरणातील प्रफुल लोढांचा मुलगा समोर; म्हणाला, खडसे अन् मोठ्या साहेबांचं षड्यंत्र

आमच्या आर्थिक परिस्थितीबाबत तुम्ही कोणत्याही चौकशा करू शकतात, आमच्याकडे काहीही नाही. मी आता एकनाथ खडसे यांच्याविरोधात न्यायालयात जाणार आहे, असे प्रफुल लोढाचे चिरंजीव पवन लोढा यांनी म्हटले.

जळगाव : सध्या राज्यभर गाजत असलेल्या हनी ट्रॅप (Honey trap) प्रकरणातील जामनेरच्या प्रफुल लोढा यांच्या परिवाराने आज माध्यमांच्या समोर येत आपली बाजू मांडली आहे. आपल्या वडिलांबाबत हनी ट्रॅप प्रकरण सांगितले जात आहे, मात्र असे काहीही नाही. हे सगळे प्रकरण पाहता मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) यांना बदनाम करण्यासाठी एकनाथ खडसे आणि मोठे साहेब यांचं षडयंत्र आहे, त्यांनी आपल्या वडिलांना अडकविले आहे, असे प्रफुल लोढाचे चिरंजीव पवन लोढा यांनी म्हटले. आपल्या वडिलांवर जे तीन गुन्हे दाखल केले आहे, ते सगळे खोटे आहेत. हे जर हनी ट्रॅप प्रकरण असते तर आम्ही नोटांमधे खेळलो असतो. हा सगळा प्रसिध्दी साठी केलेला स्टंट आहे, असेही पवन यांनी माध्यमांपुढे बाजू मांडताना सांगितले. दरम्यान, एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनीही तातडीने माध्यमांना प्रतिक्रिया देत पवन यांचे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, हनी ट्रॅपप्रकरणात राज्यातील अनेक बडे अधिकारी व काही राजकीय नेते असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

आमच्या आर्थिक परिस्थितीबाबत तुम्ही कोणत्याही चौकशा करू शकतात, आमच्याकडे काहीही नाही. मी आता एकनाथ खडसे यांच्याविरोधात न्यायालयात जाणार आहे, त्यांच्यावर लावण्यात आलेला 300 कोटीचा दंड का रद्द झाला, खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्या प्रकरणी एसआयटी ही नेमली जायला हवी. मागील काळात आपल्या वडिलांमध्ये आणि गिरीश महाजन यांच्यात काही मतभेद झाले होते. मात्र, ते एकनाथ खडसे  आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केले होते पण, ते आता दूर झाले आहेत, असेही पवन लोढा यांनी म्हटले.  

गिरीश महाजन हे आमच्यासाठी दैवत

गिरीश महाजन मोठे नेते असल्याने ते त्यांच्यावर आरोप करत आहेत, आमच्याकडे जी प्रॉपर्टी आहे ती बापजाद्यापासून आहे. खडसे यांनीच उलट भ्रष्टाचार करून पैसे कमवले आहेत. मंत्री गिरीश महाजन हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि दैवत राहणार असल्याचंही प्रफुल लोढा यांचे चिरंजीव पवन लोढा यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटलं. 

कुठल्याही मोठ्या साहेबांचा संबंध नाही

पवन लोढा यांच्या आरोपानंतर आता एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाबाबत मी कधी बोललो नाही आणि यात कुठल्याही मोठ्या साहेबांचा संबंध आला नाही. उलट प्रफुल्ल लोढा यांनी व्हिडिओमध्ये गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांचे नाव घेतले आहे. गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हणत प्रफुल्ल लोढा यांनी त्यांच्याकडे जे काही आहे त्याबाबत सांगितले. प्रफुल्ल लोढा त्यांचे कुटुंब गिरीश महाजनांना भेटले, त्यामुळे मला शंका यायला लागली आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांन दिली. 

पोलीसच पुरावे नष्ट करतील - खडसे

या प्रकरणांमध्ये जे आता समोर येणारे आहे ते दबावाखाली येतील व त्यांना दाबून पुढे येऊ देणार नाही अशी भीती माझ्या मनात आहे. दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार कर असं मी प्रफुल्ल लोढाला सांगितलं नाही. मुलींवर अत्याचार करून त्यांचे फोटो काढ, या लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकव असं मी सांगितलं नाही किंवा त्याला शिकवलं नाही. हा उद्योग त्याने केला, त्याचं पाप असेल तो फेडेल, अशा शब्दात खडसेंनी आपली बाजू मांडली. लोढा पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे त्याच्याकडे जे काही आहे किंवा जी काही माहिती आहे ती आता समोर येईल असं वाटत नाही. त्यामध्ये मंत्र्यांची नावे असल्यामुळे पोलीसच आता त्याचे पुरावे नष्ट करतील. वरिष्ठ आयपीएस आयएस अधिकाऱ्यांचे नाव त्यात आहे, त्यामुळे लोढा प्रकरणात निपक्षपाती चौकशी होईल असं मला वाटत नाही. या प्रकरणाची आता सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करून सत्य बाहेर आणावं. अनेक प्रकरणाच्या सीबीआयच्या चौकशा करण्यात आल्या, मी काही केलं नसताना माझी ही सीबीआय चौकशी करण्यात आली. तशी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे. 

भीतीपोटी कोणीही पुढे येईल, सीबीआय चौकशी करावी

गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर अशा पद्धतीचे लोढा कुटुंबीयांचे प्रतिक्रिया येणे यात नवल नाही. या प्रकरणात जो पुरावा देण्यास समोर येईल त्या पुरावेदाराच्या जीविताला सुद्धा धोका राहू शकतो अशी स्थिती आजची आहे. मलाही अनेक फोन येत आहेत, त्यांना देखील बोलायची इच्छा आह. मात्र, भीती जबरदस्त आहे. भीतीपोटी कोणीही समोर येत नाही ही भीती जर कमी झाली किंवा पोलिसांच्या हातून ही चौकशी काढून एसआयटीच्या, सीबीआयच्या हाती दिली तर या प्रकरणात असलेली भीती नष्ट होईल. या प्रकरणाची बरीचशी माहिती माझ्याकडे आहे आणि ती माहिती मला द्यायची आहे, असे मला अनेकांचे फोन आले. नाथाभाऊला भेटलो तर आपल्या मागे कोणी ना कोणी लागेल किंवा पोलीस लागतील त्या भेटीपोटी कोणी स्पष्टपणे सांगत नाही. पण, मी स्वतः हे पाहिलेलं होतं म्हणून मी याबाबत बोलतोय, असेही खडसेंनी यावेळी म्हटलं. 

हेही वाचा

दर्शन रांगेतील मंडप ठेकेदाराला मागितले पैसे; CM दौऱ्यानंतर तातडीची कारवाई, अधिकारी पाठवला घरी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
Mumbai News: 7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
1 तास 35 मिनिटांची सायकोलॉजिकल थ्रिलर आता OTT वर, क्लायमॅक्स पाहून थरकाप उडेल!
1 तास 35 मिनिटांची सायकोलॉजिकल थ्रिलर आता OTT वर, क्लायमॅक्स पाहून थरकाप उडेल!
Nashik Accident News: मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
Team India Next Cricket Schedule: न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
Embed widget