(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sadabhau Khot : धैयशील माने भाग्यवान, वळवाच्या पावसाप्रमाणे आले आणि मी मशागत केलेल्या शेतात पीक घेतले; सदाभाऊ खोतांचा हसतहसत टोला
शेवटी उमेदवारी महायुतीत कुणालाही भेटो, पण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार हा दीड लाखाहून अधीक मतांनी निवडून येईल, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
सांगली : खासदार धैयशील माने भाग्यवान आहेत, वळवाच्या पावसाप्रमाणे धैयशील माने आले आणि मी मशागत केलेल्या शेतातील पीक घेऊन गेले, मी मात्र बांधावरच बसलो अशी खोचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली. सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैयशील माने यांनी फिरकी घेत मनातील खासदारकीची खंत बोलून दाखवली. मला पण आता खासदार होऊन दिल्लीत जाऊ वाटतं, खासदार माने आपण पैरा करूया का, माझा पैरा आता फेडा तुम्ही. मी खासदार झालो तर मी तुमची खांद्यावर घेऊन मिरवणूक काढतो, असे ते म्हणाले.
शेवटी उमेदवारी महायुतीत कुणालाही भेटो, पण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार हा दीड लाखाहून अधीक मतांनी निवडून येईल, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
प्रस्थापितच्या विरोधात लढाई लढलो
त्यांनी सांगितले की, मी फाटका माणूस, परिस्थिती हालकीची पण प्रस्थापितच्या विरोधात लढाई लढलो. कारखानदारांच्या विरोधात लढाई केली. जयंत पाटील यांच्या माणसांनी मला मारले. माझ्या बापांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केले नाही. मी पदासाठी काम केले नाही. सर्वच पक्षातील लोक भाजप आत घेत आहे. जेवढं गडी आत घेता येईल ते आत घ्या. जे स्वप्न पाहिले ते घडत आहे. शरद पवार यांना चिन्ह चांगले मिळाले तुतारी. तुतारी वाजवत जायची. तुतारी मिळाली हे पाप तुमचे आहे.
महाराष्ट्राच्या कलीयुगात शरद पवार शकुनी मामा आहे. देवेंद्र फडणवीस यांना घेरायचं काम सुरू आहे, पण आमच्यासारखे शिलेदार त्यांच्या पाठीशी आहे. ते पुढे म्हणाले की, मला पण खासदार व्हावं वाटते. दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं म्हणणं मांडू द्या. खासदार होण्यासाठी हातकणंगले मतदारसंघासाठी मी तयारी केली, पण शिवसेनेचा उमेदवार फिक्स केला.
वावरातून बांधावर आणलं
जेवढी येतील तेवढी पक्षात घ्या, पण आमची अवस्था काय केली आहे तुम्ही. वावरातून बांधावर आणलं. पण आम्ही नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आहे. कारण महायुतीच सरकार आणायचं आहे. मी आईची शपथ घेऊन या व्यासपीठावर सांगतो मी मंत्री झालो, पण आजपर्यंत कोणाला लुबाडलं नाही. मी माझा स्वाभिमान गहाण ठेवला नाही. सर्व पक्ष हिंडून आलेला आपल्या पक्षात चालणार नाही. या मतदारसंघात तिकीट कोणालाही मिळू दे पण आपण त्याला निवडून द्यायचं आहे, असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या