Chandrashekhar Bawankule : बारामती लोकसभा मतदारसंघातील विजय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय असेल; चंद्रशेखर बावनकुळेंचं 'पाॅवर'मय भाकित!
बारामती लोकसभा मतदारसंघातला विजय हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा विजय असेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते आज सांगलीत बोलत होते.
सांगली : बारामती लोकसभेमध्ये अजित पवार देतील त्या उमेदवाराला 60 टक्क्यांवर मतं मिळतील आणि बारामती लोकसभा मतदारसंघातला विजय हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा विजय असेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते आज सांगलीत बोलत होते.
पण मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचार झाला नाही
बावनकुळे म्हणाले की, राजीव गांधी यांनी 100 पैशात 85 पैसे खाल्ले जायचे, असे मान्य केले होते. या भ्रष्टाचारामागे कोण होते हे सर्वांना माहीत आहे, पण मोदी सरकार मध्ये भ्रष्टाचार झाला नाही. जगातील अनेक नेत्यांनी मान्य केलं की मोदी जगातील शक्तिशाली पंतप्रधान आहेत. जगातील 103 देशाला कोविड लस देण्याचे काम केले म्हणून मोदींना विश्व युगपुरुष म्हणतात. गरीब कल्याणचा अजेंडा नरेंद्र मोदी साहेबानी दिला. मोदींच्या महिला सबलीकरणच्या निर्णयामुळे 192 महिला खासदार आणि 110 महिला आमदार असणार आहेत.
भारताला तोडण्याचे काम काँग्रेस पार्टीने केले होते
ते म्हणाले की, आपल्या नेतृत्वाला 150 देशांनी जगातील सर्वोत्कृष्ट नेतृत्व असल्याचे मान्य केले. ते जगातील सर्वोत्कृष्ट नेते आहेत, आपल्याला मोदींनी वाचवण्याची काम केले. जगातील 103 देशांना कोविड लस देऊन वाचवण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. राहुल गांधी भारत जोडो व न्याय यात्रा काढत आहेत,पण भारताला तोडण्याचे काम काँग्रेस पार्टीने केले होते. यंदा 182 कोटी लोक काश्मीरला जाऊन आले आहेत. कारण कलम 370 हटवले, भयमुक्त काश्मिर बनलं.
ठाकरे सरकारने गरीब मराठा समाजाचा विचार केला नाही. मर्द मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी आरक्षण दिले. मराठा समाजाल दिलेले 10 टक्के आरक्षण टिकणारे आरक्षण आहे. मराठा समाजाचे 10 टक्के आरक्षण कोणीचं काढू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.
नणंद-भावजयी बारामतीच्या दौऱ्यावर
दुसरीकडे, अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार लोकसभेचं मैदान गाजवणार असल्याच्या चर्चा सुरु असताना आणि त्यांचा विकास रथ शहरात फिरत असताना नणंद खासदार सुप्रिया सुळेंनीदेखील (Supriya Sule) बारामती लोकसभेसाठी कंबर कसली आहे. नणंद- भावजय दोघीही एकाच दिवशी बारामतीचा दौरा करत आहेत. तसेच विकासकामांचा आढावा आणि पाहणी करत आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात शड्डू ठोकल्यानंतर सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांनीही आता बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या