Sangli Crime : सांगलीत पहाटेच्या सुमारास दरोडा; बंगल्यातील लोकांचे हात-पाय बांधून चार लाख रुपयांचे दागिने लंपास
Sangli Crime : पाच ते सहा दरोडेखोरांनी एका बंगल्याच्या मागील बाजूने घुसून घरातील लोकांना दमदाटी करत, काहींचे हातपाय बांधून सुमारे चार लाख रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले.
Sangli Crime : सांगली शहरातील (Sangli Crime) कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगरमध्ये पहाटेच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. पाच ते सहा दरोडेखोरांनी एका बंगल्याच्या मागील बाजूने घुसून घरातील लोकांना दमदाटी करत आणि काहींचे हातपाय बांधून सुमारे चार लाख रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले. ज्यांच्या बंगल्यात हा दरोडा पडला त्या आशिष चिंचवाडे यांनी याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अज्ञात पाच ते सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व 6 दरोडेखोर बंगल्यात घुसताना चेहऱ्यावर मास्क, तोंडाला काहीही न बांधता उजळमाथ्याने घुसले होते. त्यामुळे ज्या घरात चोरी झाली त्या घरातील लोकांकडून माहिती घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
चिंचवाडे दत्तनगर येथे कुटुंबासोबत राहतात. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच ते सहा जणांनी घराच्या मागील बाजूच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील झोपलेल्या लोकांना उठवून घातक हत्यारांचा धाक दाखवला. कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर त्यांचे हातपाय बांधले. मग घरातील चार लाखाचे सोन्या चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले अशी फिर्याद कुटुंबाकडून देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केलीत.
कवलापूर ग्रामपंचायतीजवळ एक कोटीचे सोने जप्त
दरम्यान, सांगलीपासून जवळच असणाऱ्या कवलापूर ग्रामपंचायतीजवळ निवडणूर रणधुमाळी सुरु असतानाच दोन तरुणांकडून एक कोटी पाच लाखांचे (One crore worth of gold seized) सुमारे दोन किलो संशयास्पद सोने पोलिसांनी हस्तगत केले होते. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी (Gram Panchayat Election) संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पथक गस्त घालत असताना कवलापूर ग्रामपंचायतजवळ दोन तरुणांना संशयास्पद हालचालीमुळे ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ 1 किलो 994 ग्रॅम सोने बार स्वरुपात मिळाले.
जप्त केलेल्या सोन्याचे मूल्य 1 कोटी 5 लाख 68 हजार 200 रुपये आहे. या प्रकरणी रोहित चव्हाण (27) आणि संतोष नाईक (26) या दोघांना ताब्यात त आले आहे. सोन्याबाबत विचारले असता त्यांनी हे सोने विक्रम मंडले ज्वेलर (रा.बांबवडे सध्या जालना) यांचे असल्याचे सांगितले. मात्र, मालकी सिध्द करणारी कागदपत्रे नसल्याने संशयास्पद सोने व तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या