एक्स्प्लोर

Jayant Patil : दोघेही लग्नासाठी उत्सुक असतील आणि भटजीचा अडथळा असेल तर पळून जाऊन लग्न करावं, जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

Jayant Patil On Prakash Ambedkar : शिवसेना (Shiv Sena) आणि वंचितचा साखरपुडा झाला आहे पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे भटजी त्यामध्ये अडथळे आणत असल्याची टीका वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केली होती. 

सांगली : दोन जण लग्नास उत्सुक असतील आणि भटजी अडथळा करत असेल तर पळून जाऊन दोघांनी लग्न करणे हा पर्याय असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar)  लगावलाय. ठाकरे आणि आमचा साखरपुडा झाला आहे, मात्र लग्नाच्या मुहूर्तासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीरूपी दोन भटजी अडथळे आणत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यावर आज जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. 

जयंत पाटील यांनी आज सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली. त्यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लग्नासाठी दोघेही उत्सुक असतील आणि भटजी अडथळा आणत असतील तर पळून जाऊन लग्न करावं. 

जयंत पाटील पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांचे राष्ट्रवादीला आणि इंडिया आघाडीला काही वावडं नाही. पण आघाडीत यायचं असेल तर काही नियम पाळली पाहिजेत.

टेंभू पाणी योजनेच्या विस्तारीकरणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील आंदोलन करत आहेत. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आबांच्या कुटुंबाच्या आंदोलनाकडे सरकारने अद्याप हवा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने पाऊले टाकून सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी द्यावी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावा. 

घोडंमैदान लांब नाही

राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार यांनी दावा केला असून ते निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडणार आहेत. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी कोणाची यावर येत्या 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे घोडंमैदान लांब नाही. भारतात राष्ट्रवादी काँग्रेसचे 23 राज्यात अस्तित्व आहे. त्यापैकी 19 राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. पक्ष आमदारांचा नसतो, कार्यकर्त्यांचा असतो. कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आहे.

शरद पवार हे भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा केल्या जातात, त्यावर विचारल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीत येणार आहेत असे सांगितलं तर शंका निर्माण होऊ शकते का?  असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी विचारला. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
GST Registration : 1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार, निर्मला सीतारामन यांची माहिती
1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satara Doctor Case : '...राजकारण केलं जातंय', महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी रणजित Nimbalkar यांचा आरोप
Crime Files: पत्नीसोबतच्या वादातून बापाचा राक्षसी अवतार, दोन जुळ्या मुलींची हत्या
Satara Doctor Case: '...तो गुन्हेगार कुठच्या पक्षाचा आहे याच्याशी घेणंदेणं नाही'
Rohit Sharma Century : सचिनशी बरोबरी करत रोहितचे ऑस्ट्रेलियाच्या विरोधात दणदणीत शतक; शतकांचे अर्धशतक रोहित शर्माच्या नावे!
Phaltan Doctor case: 'माजी खासदार Ranjitsinh Nimbalkar यांना सहआरोपी करा', Ambadas Danve यांची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव, प्रश्नांचा भडीमार, जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
GST Registration : 1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार, निर्मला सीतारामन यांची माहिती
1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार
Phaltan Crime : फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
Actor Satish Shah Passed Away: बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
Shivsena : मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच मोठी अपडेट
मोठी बातमी, महायुतीत समसमान जागा वाटप व्हावं, मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही
Phaltan Doctor Death: 80 ते 90 पोस्टमार्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? दबाव आणून तिला जीव द्यायला प्रवृत्त केलं; डॉक्टर तरुणीच्या बहिणीचा आरोप
80 ते 90 पोस्टमार्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? दबाव आणून तिला जीव द्यायला प्रवृत्त केलं; डॉक्टर तरुणीच्या बहिणीचा आरोप
Embed widget