एक्स्प्लोर

Sangli News : 'उडाण' अंतर्गत कवलापूरमध्येच विमानतळ करा; आमदार सुधीर गाडगीळांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

Sangli News: कवलापूर येथे आरक्षण झाल्यास जिल्ह्याच्या कृषी व औद्योगिक विकासाला चालना मिळेल, त्यामुळे या जागेवरच विमानतळ विकसित करावे, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली आहे.

Sangli News : कवलापूरमध्येच विमानतळासाठी 160 एकर जागा आरक्षित आहे. या जागेवर पूर्वी धावपट्टीही होती. कवलापूर (airport in Kavalapur) येथे आरक्षण झाल्यास जिल्ह्याच्या कृषी व औद्योगिक विकासाला चालना मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 'उडाण' या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत या जागेवरच विमानतळ विकसित करावे, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

आमदार गाडगीळ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांना सदर प्रस्ताव तातडीने तपासून सादर करण्याबाबत आदेश दिले आहेत.

सुमारे 60 वर्षांपूर्वी सांगली शहरापासून जवळ असलेल्या कवलापूर येथे विमानतळासाठी (airport in Kavalapur) 160 एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. या जागेवर विमानासाठी धावपट्टीही तयार करण्यात आली होती. आजही तिथे धावपट्टीच्या खुणा आहेत. या जागेवरच विमानतळ व्हावे अशी समस्त सांगलीकरांची भावना आहे. मात्र अद्याप त्या ठिकाणी विमानतळ झालेले नाही. सध्या ही जागा औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. ही जागा काही कारणासाठी एका खाजगी कंपनीस विकण्याचा तथा विकसित करण्याचा प्रस्ताव झाला होता. त्यावेळेस सांगलीकर जनतेकडून त्या प्रस्तावास विरोध झाला होता. त्यामुळे ही जागा विकण्याचा तथा विकसित करण्याचा प्रस्ताव रद्द झाल्याचे समजते.

भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून सांगलीचा विकास वेगाने होत आहे. सांगलीपासून जवळच चार राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे या परिसरात शेती व उद्योगधंद्यांना पूरक वातावरण निर्माण होत आहे. मात्र मोठ्या कंपन्या सांगलीत उद्योगासाठी येण्यास विमानतळही महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी तसेच औद्योगिक विकासासाठी सदर प्रकल्प मंजूर करावा व सांगली कवलापूर विमानतळाच्या (airport in Kavalapur) आरक्षित जागेसाठी आणखी काही जमीन अधिग्रहण करून व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदिजींच्या "उडाण' या महत्वपूर्ण प्रकल्पाअंतर्गत या जागेवरच विमानतळाचा प्रकल्प पूर्ण करावा अशी मागणी गाडगीळ यांनी केली आहे.

दरम्यान, कवलापूर विमानतळाची (airport in Kavalapur) जागा विकण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने रद्द केला आहे. या जागेसाठी आलेले तीनही प्रस्ताव फेटाळल्याची माहिती बचाव कृती समितीचे सतीश साखळकर यांनी दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूचWalmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोपNashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Embed widget