(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Khidrapur Bridge: एबीपी माझाचा दणका; खिद्रापूर पुलाबाबत अहवाल सादर ,गावकऱ्यांचा बहिष्कार मागे
Khidrapur Bridge: ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार घालण्याच्या भूमिकेत असल्याची बातमी एबीपीनं दाखवली होती यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली आहे.
कोल्हापूर: खिद्रापूरच्या (Khidrapur) अर्धवट पुलासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर 10 तारखेला महत्त्वाची बैठक बोलावलीय. या बैठकीत पुलासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भू संपादनासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. या रखडलेल्या पुलामुळे नागरिकांना होणार त्रास एबीपी माझानं (ABP Majha Impact) दाखवला होता. यावरून ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार घालण्याच्या भूमिकेत असल्याची बातमी एबीपीनं दाखवली होती यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शेवटच्या खिद्रापूर या गावात गेले दोन वर्ष झोपी गेलेला प्रशासन एबीपी माझाच्या दणक्यानंतर जागं झालाय, आणि कामाला लागलाय. कालच एबीपी माझा ने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शेवटच्या खिद्रापूर गावात कर्नाटक सरकारने बांधलेला पूल महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षामुळे कसा अर्धवट स्थितीत आहे आणि त्यामुळे ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार घालण्याच्या भूमिकेत आहे अशी बातमी दाखवली होती. त्यानंतर अवघ्या काही तासात प्रशासनात हालचाली झाल्या महसूल विभागाचे अधिकारी गावात पोहोचले आणि त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत मतदान करण्यास राजी केले होते.
अर्धवट पुलाच्या पोच मार्गासाठी आवश्यक
तर आज जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अर्धवट पुलाच्या पोच मार्गासाठी आवश्यक जमिनीचा भूसंपादन करण्यासाठी दहा रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. संबंधित पुलासाठी पोचमार्ग निर्माण करण्यासाठी आवश्यक जमिनीचे लवकरात लवकर भूसंपादन करण्यात यावे आणि त्यासाठी दर निश्चित करण्यात यावं यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे गेले दोन वर्ष जे होऊ शकलं नव्हतं, ते एबीपी माझाच्या बातमीनंतर एकाच दिवसात मार्गी लागले आहे.
महाराष्ट्राच्या बाजूच्या खर्चामुळे पूल अर्धवट स्थितीत
कर्नाटक सरकार 28 कोटी रुपये खर्च करून पूल महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पूल बांधू शकते. मात्र, त्या पुलाच्या उतरंडसाठी महाराष्ट्र सरकार 80 लाख रुपये खर्च करून आवश्यक जागा देऊ शकत नसेल, तर आम्ही मतदान का करावं असा प्रश्न खिद्रापूर मधील तरुणांनी उपस्थित केला होता. विशेष म्हणजे कृष्णा नदीत दरवर्षी येणाऱ्या पुराच्या काळात परिसरातील उंच भागाकडे सुरक्षित जाण्यासाठीही हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, तरीही अवघ्या 80 लाख रुपयांच्या महाराष्ट्राच्या बाजूच्या खर्चामुळे पूल अर्धवट स्थितीत असल्याने महाराष्ट्रातील मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
हे ही वाचा :