एक्स्प्लोर

Mahalaxmi Atta Chakki Sangli: सांगलीची महालक्ष्मी आटाचक्की चालली अमेरिकेला! ग्राहकाच्या आग्रहाखातर 22 किलो वजनाची आटाचक्की केली डिझाईन 

आतापर्यंत सांगलीचा भडंग , द्राक्षे, बेदाणा, हळद, वीणा परदेशात निर्यात झालेले आपण ऐकलं असेल, पण आता सांगलीमधून एक आटाचक्की थेट अमेरिकेला पाठवण्यात येणार आहे.

Mahalaxmi Atta Chakki Sangli: आतापर्यंत सांगलीचा भडंग , द्राक्षे, बेदाणा, हळद, वीणा परदेशात निर्यात झालेले आपण ऐकलं असेल, पण आता सांगलीमधून एक आटाचक्की थेट अमेरिकेला पाठवण्यात येणार आहे. सांगलीत महालक्ष्मी आटाचक्की हा आटाचक्कीचा प्रसिद्ध ब्रँड असून अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका ग्राहकाच्या आग्रहाखातर 22 किलो वजनाची आणि अर्धा एचपी पॉवरची महालक्ष्मी आटाचक्की डिझाईन करण्यात आली आहे. ती आता मुंबई आणि पुढे विमानामार्गे अमेरिकेत जाईल. 

एका नातेवाईकाकडून महालक्ष्मी आटाचक्की बाबत कल्पना

साधारण 50 ते 70 किलोपर्यंतच्या आटाचक्कीचे आतापर्यंत महालक्ष्मी आटाचक्की समूहात उत्पादन केले जात होते, पण अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या ग्राहकाच्या आग्रहाखातर आणि विमानाने अमेरिकाला आटाचक्की पाठवायची आहे हे लक्षात घेऊन आटाचक्कीच्या डिझाईन मध्ये बदल करत वजनात कमी करुन ते जवळपास 22 किलो इतके करून आटाचक्कीचे नवीन छोटे मॉडेल डिझाइन करण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये अजिंक्य सुरेश ससे वास्तव्यास आहेत. त्यांना घरीच धान्य दळणारी एक आटाचक्की हवी होती. यासाठी त्यांनी शोध सुरु केल्यानंतर त्यांना मुळच्या कोल्हापूरमधील एका नातेवाईकाकडून महालक्ष्मी आटाचक्की बाबत कल्पना दिली. त्यांनी महालक्ष्मी आटाचक्की उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष माने यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी अमेरिकेत आटाचक्की पाठवण्याबाबत विचारणा केली. 

सुभाष माने यांनी देखील आटाचक्की पाठवण्याबाबत तयारी दर्शवली, पण अडचण येत होती त्या आटाचक्कीच्या वजनाची. साधारणत 50 ते 70 किलोपर्यंतच्या आटाचक्कीचे महालक्ष्मीकडून निर्मिती केली जाते. तथापि, या ग्राहकाच्या आग्रहाखातर आणि विमानाने अमेरिकाला आटाचक्की पाठवायची आहे हे लक्षात घेऊन  22 किलो वजनाची आटाचक्कीचे मॉडेल डिझाइन करण्यात आले. उंची 2 फूट आणि रुंदी 1 फूट ठेवण्यात आली आणि अर्धा एचपी पॉवरची मोटर बसवण्यात आली. ऑर्डर आल्यापासून एक महिन्याच्या आत ही खास आटाचक्की बनवण्यात आली. 

आटाचक्कीच्या दारावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या चित्राला स्थान

आपली आटाचक्की अमेरिकेला जाते याचा आनंद महालक्ष्मी आटाचक्की उद्योग समूहाचे सुभाष माने यांना इतका झाला, की त्यांनी अमेरिकेची खास ओळख असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या चित्राला आटाचक्कीच्या दारावर स्थान दिले. यामुळे या आटाचक्कीला अमेरिकेन लुकही आला. 

ग्राहकाला मूळ किमतीपेक्षा आटाचक्की पाठवण्याचा खर्च अधिक

आटाचक्कीच्या मूळ किमतीपेक्षा ही आटाचक्की अमेरिकेला पाठवण्याचा खर्च जास्त आला आहे. मात्र, तरीही अमेरिकेतील ग्राहकाने आपल्या मायदेशातील आटाचक्की अमेरिकेत येते याचा आनंद होता आणि महालक्ष्मी आटाचक्कीच्या मालकांनी आपली आटाचक्की अमेरिकेत जाते याचा आनंद होता. यामुळे त्यांनीही खुशीने ही खास आटाचक्की डिझाईन केली आणि अमेरिकेला पाठवण्याची तयारी दर्शवली.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
Sangli Crime News: सांगली जिल्हा गुन्ह्यांच्या मालिकेने हादरला; 10 किलोमीटरच्या अंतरातील घटना, कवलापूरला वेटरचा, कुपवाडला बांधकाम कामगाराचा अन् तरुणाला संपवलं
सांगली जिल्हा गुन्ह्यांच्या मालिकेने हादरला; 10 किलोमीटरच्या अंतरातील घटना, कवलापूरला वेटरचा, कुपवाडला बांधकाम कामगाराचा अन् तरुणाला संपवलं
Maharashtra Unseasonal Rain: राज्यात अवकाळीचे धुमशान सुरूच, अस्मानी संकटानं बळीराजाचा तोंडचा घास हिरावला; पुढचे 48 तास धोक्याचे, 16 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात अवकाळीचे धुमशान सुरूच, अस्मानी संकटानं बळीराजाचा तोंडचा घास हिरावला; पुढचे 48 तास धोक्याचे, 16 जिल्ह्यांना अलर्ट

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Sharad Pawar on Varkari: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
Embed widget