Sangli News : आमच्या रक्तात जन्मत: संघर्ष, आम्हाला चुकूनही खोडी करायची सवय नाही; अनिल बाबरांचा खासदार संजयकाका पाटलांवर पलटवार
Sangli News : आम्हाला चुकूनसुद्धा खोडी करायची सवय नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी भाजप खासदार संजयकाका पाटील (Anil Babar on Sanjaykaka Patil on in Sangli) यांच्यावर पलटवार केला.
Sangli News : अनिल बाबर राजकारणात आल्यापासून संघर्षात आहे. त्यामुळे प्रत्येकाने मागच्या आठवणी लक्षात ठेवाव्यात, आम्हाला चुकूनसुद्धा खोडी करायची सवय नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी भाजप खासदार संजयकाका पाटील (Anil Babar on Sanjaykaka Patil on in Sangli) यांच्यावर पलटवार केला. खासदार संजयकाका पाटील यांनी सत्तेला नमस्कार घालणारे आम्ही नाही, असा टोला त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांना लगावला होता. सातबारावर कर्ज काढून तुम्ही टेंभू योजना पूर्ण केली नाही, अशी टीकाही त्यांनी केली होती. या टीकेनंतर अनिल बाबर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
खासदार संजयकाका पाटील हे भाजपमध्ये आहेत का?
ते म्हणाले की, आम्हाला चुकूनसुद्धा खोडी करायची सवय नाही. आमच्या रक्तात जन्मत:च संघर्ष आहे. आम्हाला चुकूनसुद्धा खोडी करायची सवय नाही. आम्ही काम करत राहणार. ज्यांनी त्यांनी आपल्या मागील प्रसंगाच्या आठवणी ठेवाव्यात असे ते म्हणाले. खासदार संजयकाका पाटील हे भाजपमध्ये आहेत का? असे म्हणत त्यांनी समाचार घेतला. ते खंबाळे भाळवणीत बोलत होते. आम्ही पथ्य मोडत नाही, मागच्यावेळी एकत्र असल्याने मदत केली, आठवण असो वा नसो. असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, खानापुरातील हिंगणगादे या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार संजयकाका पाटील यांनी तोफ डागली होती. म्हणाले की, सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही. संघर्ष आमच्या रक्तात आहे. तसेच टेंभूचे पाणी काय स्वतःच्या सातबारावर कर्ज काढून आणले आहे का? असा खडा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, तुम्ही जेष्ठ आहात, आम्ही तुमचा आदर करतो पण कुणाला तरी बघून घेतो, कुणाला तरी इन्कम टॅक्स लावतो, कुणाला काय? हे चालणार नाही. सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही. संघर्ष आमच्या रक्तात आहे.
यशवंत कारखान्यावरून संघर्षाची ठिणगी
दरम्यान, खानापूर तालुक्यातील नागेवाडीमधील यशवंत कारखान्यावरून खासदार संजयकाका पाटील आणि शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यात सुरु झालेला संघर्ष वाढत चालला आहे. खानापूर आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेच्या श्रेयवादातून भाजप खासदार संजयकाका पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यात संघर्ष सुरू आहे. अनिल बाबर हे आपणच टेंभू योजनेचे जनक आणि योजना पूर्ण केल्याचा आव आणत असल्याचा आरोप तालुक्यातील विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच मुद्यावरुन संजयकाका पाटील यांनी अनिल बाबरांवर टीकास्त्र सोडले होते.
इतर महत्वाच्या बातम्या