Sangli News : शिक्षक आणि अधिकारी असलेल्या बहिण-भावाने नोकऱ्यांचे आमिष दाखवून 45 जणांना घातला 5 कोटींचा गंडा
Sangli News : शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून 45 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शैलेजा दराडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Sangli Crime : शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून 45 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शैलेजा दराडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शैलजा दराडे या सध्या राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त आहेत. याबाबत सांगली (Sangli News) जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपटराव सूर्यवंशी या शिक्षकाने हडपसर ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) आणि शैलेजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण) यांच्यावर गुन्हा दाखल केला. दादासाहेबने शैलजा या शिक्षण विभागात प्रशासनात अधिकारी असल्याचे सांगितले.
पोपटराव सूर्यवंशी यांच्या दोन वहिनींना शिक्षक पदावर नोकरी लावण्यासाठी दादासाहेब यांनी पोपटराव सूर्यवंशी यांच्याकडून जून 2019 मध्ये 27 लाख रुपये घेतले. अशाच प्रकारे इतर 44 जणांची लाखो रुपयांची फसवणूक केली. हा सगळा व्यवहार 2019 मध्ये झाला आणि शैलजा यांनी आपला दादासाहेब यांच्याशी काहीही संबंध नाही, भाऊ असल्याच्या नात्याने कोणीही त्याच्याबरोबर कसलाही व्यवहार करू नये, अशी जाहीर नोटीस ऑगस्ट 2020 मध्ये दिली होती, जी आमची दिशाभूल करण्यासाठी असावी असा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे.
शैलेश दराडे यांनी दादासाहेब दराडे यांनी वेगवेगळ्या पदांसाठी पैशांची यादीच तयार केली होती. बीएडसाठी 15 लाख, डीएडसाठी 12 लाख, तलाठी पदासाठी 12 लाख, टीईटी पास करण्यासाठी 4 लाख रुपये दर लावल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शैलजा यांची सेंट्रल बिल्डिंग येथील शिक्षण आयुक्त कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी माझे नाव कुठेही बाहेर घ्यायचे नाही. मुंबईतून काम होते, असे लोकांना सांगा, असं त्या म्हणाल्या होत्या. तसेच पदनिहाय रेटकार्डच सांगितले. रक्कम रोख स्वरूपात स्वीकारणार, असे त्यांनी स्पष्ट केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या