Sangli News : सांगली शहरातील वानलेसवाडी हायस्कूलमधील 32 मुलांना विषबाधा
सांगली शहरातील वानलेसवाडी हायस्कूलमधील 32 मुलांना विषबाधा झाली आहे. मळमळ, उलटी, पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 32 विद्यार्थी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
Sangli News : सांगली शहरातील वानलेसवाडी हायस्कूलमधील (32 children of Wanleswadi High School food poisoned) 32 मुलांना विषबाधा झाली आहे. मुलांना मळमळ, उलटी, पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 32 विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हायस्कूलमध्ये दिलेल्या डाळ-भातातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही सर्व पाचवी ते सातवी पर्यंतची मुले आहेत.
विजयनगरमधील वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहारमधील डाळ-भातातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मळमळ, उलटी आणि जुलाब हा प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलून दाखवलं. मात्र, त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली. यातील काही विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देखील करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या