एक्स्प्लोर

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाच्या टोलमुळे शासनाला महसुलाची 'समृद्धी' ; तब्बल 422 कोटी 9 लाख रुपयांची वसूली 

Samruddhi Highway :: समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या महामार्गावरून डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या कालावधी दरम्यान टोलमुळे शासनाला महसुलाची देखील समृद्धी झाली आहे.

Samruddhi Highway : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) प्रवाश्यांसाठी खुला करण्यात आला आहे. त्या घटनेला येत्या 11 डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या महामार्गावरून डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या कालावधी दरम्यान टोलमुळे (Highway Tolls) शासनाला महसुलाची देखील समृद्धी झाली आहे. या कालावधीमध्ये समृद्धी महामार्गावरून तब्बल 54 लाख 54 हजार 862 वाहने धावली. ज्यामध्ये या वाहनांकडून तब्बल 422 कोटी 9 लक्ष 79 हजार 399 रुपयांचा टोल महसूल जमा झाला आहे.

प्रवाशांची समृद्धी महामार्गाला पहिली पसंती 

महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय महत्वाकांक्षी ठरलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गने प्रवास करणाऱ्या वाहनांनी विक्रमी संख्या गाठली आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्यातील मार्ग प्रवाश्यांसाठी खुला करण्यात आला होता. तर 26 मे 2023 पासून शिर्डी ते भरवीरपर्यंत दुसऱ्या टप्प्याच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली. एरव्ही या महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे कायम चर्चेत राहणारा हाच समृद्धी महामार्ग आता प्रवशांसाठी मोठे वरदान ठरतो आहे. कारण  गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांनी विक्रमी संख्या गाठली. विशेष म्हणजे हा महामार्ग सुरू झाल्यापासून 422 कोटी 9 लक्ष 79 हजार 399 रुपयांचा टोल महसूल जमा झाला आहे. अवघ्या काही तासात नागपूर ते मुंबई, शिर्डी, नाशिक व इतर शहरांमधील अंतर कमी झाले. परिणामी प्रवाश्यांच्या वेळेची आणि पैश्यांची देखील बचत होत असल्याने या महामार्गाला पसंती मिळाली आहे. 

समृद्धीवर अपघाताची शृंखला सुरूच

मधल्याकाळात समृद्धी महामार्गवर वाढत्या अपघातांमुळे रस्त्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. ही अपघातांची मालिका अद्याप देखील सुरू आहे. गेल्या 30 नोव्हेंबरपर्यंत या मार्गावर विविध गंभीर प्रकारचे 73 अपघात होऊन या अपघातात 142 जणांना आपले प्राण गमावले लागले. तर 4 डिसेंबर 2023 पर्यंत 1 हजार 489 अपघात झाले. तर काल 7 डिसेंबरला पपई घेऊन जाणाऱ्या ट्रकचा समृध्दीवर महामार्गावर अपघात झाला. मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्या हा ट्रकचा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा जवळ ट्रक डिव्हायडरला धडकला. चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

समृद्धीवर अपघातानंतर लूटमार प्रकरणात फार तथ्य नाही 

मधल्या काळात समृद्धी महामार्गावर काही गैरप्रकार होत असल्याचा व्हिडिओ समाज मध्यमावर वायरल होत होता. या प्रकरणाची दखल घेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी 6 डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इंटरचेंज जवळील समृद्धी महामार्गाच्या विश्राम भवन येथे आढावा बैठक घेतली. या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून समृद्धी मागमार्गावर अपघातानंतर लुटीचा प्रकार झाल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असल्याचा प्रश्न केला असता, अपघात झल्यांनातर 10 मिनिटाच्या आत सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आमच्या माहिती प्रमाणे अद्याप असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे दादा भुसे बोलत होते. समृद्धी महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी 13 क्रेन, 17 शीघ्र प्रतिसाद वाहने 17 रुग्णवाहिका, 13 महामार्ग सुरक्षा पोलिस केंद्र, महाराष्ट्र  राज्य सुरक्षा महामंडळ तर्फे 141 सुरक्षा पथके तैनात करण्यात आली असल्याचे देखील ते म्हणाले.  

दिवाळी दरम्यान विक्रमी संख्येने धावल्या कार

महाराष्ट्राच्या विकासाच्यादृष्टीने अतिशय महत्वाकांक्षी महामार्ग ठरलेल्या समृद्धी माहामार्गाने (Samruddhi Highway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली. दिवाळी (Diwali) दरम्यान या महामार्गावर प्रवास करणाऱ्या कारच्या संख्येने विक्रमी आकडेवारी गाठली. 1 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान या महामार्गावरून 2 लाख 65 हजार 856 कार धावल्या होत्या. तर नोव्हेंबर महिन्याच्या 1 ते 21 या कालावधी दरम्यान हीच आकडेवारी तब्बल 3 लाख 82 हजार 416 वर गेली आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारची वाहतूक झाली असली तरी, या कालावधीमध्ये अत्यंत कमी अपघात झाले आहेत. तसेच हा महामार्ग सुरू झाल्यापासून आपघातांचीही आकडेवारी आतापर्यंतची सर्वात कमी आहे.

संबंधित इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget