Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दिवाळीत विक्रमी वाहतूक, आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडले
Samruddhi Highway : दिवाळीदरम्यान प्रवाशांनी समृद्धी महामार्गाला पहली पसंती दिली आहे. विशेष बाब म्हणजे या काळात या मार्गावरुन विक्रमी वाहतूक झाली. इतकंच नाही तर अपघातांची संख्याही कमी झाली.
Samruddhi Highway : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) एरव्ही कायम चर्चेत राहतो तो यावर होणाऱ्या अपघातांमुळे(Samruddhi Highway), मात्र हाच समृद्धी महामार्ग आता प्रवशांसाठी मोठे वरदान ठरतो आहे. कारण गेल्या महिन्याभरात म्हणजेच दिवाळीच्या काळात या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांनी विक्रमी संख्या गाठली. विशेष म्हणजे हा महामार्ग सुरू झाल्यापासून इतक्या मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गावर पहिल्यांदाच कार धावल्या. तसंच या मार्गावर अत्यंत कमी अपघात या काळात झाले आहे.
समृद्धी महामार्गावरून दिवाळी दरम्यान विक्रमी संख्येने धावल्या कार
महाराष्ट्राच्या विकासाच्यादृष्टीने अतिशय महत्वाकांक्षी महामार्ग ठरलेल्या समृद्धी माहामार्गाने (Samruddhi Highway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली. दिवाळी (Diwali) दरम्यान या महामार्गावर प्रवास करणाऱ्या कारच्या संख्येने विक्रमी आकडेवारी गाठली. 1 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान या महामार्गावरून 2 लाख 65 हजार 856 कार धावल्या होत्या. तर आता नोव्हेंबर महिन्याच्या 1 ते 21 या कालावधी दरम्यान हीच आकडेवारी तब्बल 3 लाख 82 हजार 416 वर गेली आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारची वाहतूक झाली असली तरी, या कालावधीमध्ये अत्यंत कमी अपघात झाले आहेत. तसेच हा महामार्ग सुरू झाल्यापासून आपघातांचीही आकडेवारी आतापर्यंतची सर्वात कमी आहे.
ऐन दिवाळीच्या एकाच दिवशी धावल्या तब्बल 30 हजार 543 कार
दिवाळीच्या दरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नागपूर ते मुंबई-पुणे आणि परत याच मार्गावर प्रवास करण्यासाठी समृद्धी महामार्गाला पहली पसंती दिली. विशेष बाब म्हणजे 18 नोव्हेंबर या ऐन दिवाळीच्या एकाच दिवशी समृद्धी महामार्गावरून तब्बल 30 हजार 543 कार धावल्या. आतापर्यंत एकाच दिवशी कारने गाठलेली ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
समृद्धी महामार्गाला मिळाली पहली पसंती
दिवाळीच्या दिवसात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची, पर्यटक, प्रवाशांची संख्या ही फार मोठी असते. विशेषत: याच कालावधी मध्ये रेल्वे रिझर्वेशन मिळणे हे देखील मोठे आव्हान असतं. तसेच विमान प्रवासाचे आवाक्याबाहेरील दर इत्यादी अनेक कारणांमुळे या दिवाळीत समृद्धी महामार्गाला पर्यटक, प्रवसी आणि चाकरमान्यांनी पहिली पसंती दिली. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर नोव्हेंबर महिन्यात 13 अपघात झाले. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी हे अपघात तुलनेने कमी आहेत.