एक्स्प्लोर

Sambhajiraje Chhatrapati : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हेच दुर्दैवी; छत्रपती संभाजीराजेंची उद्विग्न प्रतिक्रिया

Sambhajiraje Chhatrapati : संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे जावं लागणं हेच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

लातूर: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान आज राज्यातील अनेक भागात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. अशातच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट करणारे तात्काळ फासावर लटकवा. मंत्री धनजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा. संतोष देशमुख यांच्या परिवारास आर्थिक मदत करावी.अशा अनेक मागण्यांनी सध्या जोर धरला आहे. 

अशातच, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे जावं लागणं हेच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणावरती छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर परत एकदा वार करत जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.धनंजय मुंडे यांच्यामध्ये इतकं काय आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच भूमिका घेत नाहीत. धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे आहेत, म्हणून सरकार ठोस भूमिका घेत नाही का? असा सवालही  छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे

महाराष्ट्राच्या जनतेला मुर्खात काढत आहात का? 

संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीय रंग देऊ नये. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट केवळ नवीन वर्षाचे शुभेच्छा देण्यासाठी होती का महाराष्ट्राच्या जनतेला मुर्खात काढत आहात का? संतोष देशमुख यांना मारत असल्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांना मिळाले आहेत. पोलीस ते व्हिडिओ जनतेसमोर का आणत नाहीत? संतोष देशमुख यांच्या हत्येची तपासणी करण्यासाठी एसआयटी नेमली त्यामध्ये वाल्मीक कराड सोबत संबंध असलेले अधिकारी बीड मधील लहान मुलांपासून सर्वांना माहिती आहे. या प्रकरणातील आरोपी कोण आहेत हे साऱ्यांना माहिती आहे. मग सरकार याकडे दुर्लक्ष का करत आहे? सा सवालही  छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. 

 जर कोणी धमकी देण्याचे धाडस केलं तर.... 

महाराष्ट्रामध्ये दहशत पसरवण्याचे काम या घटनेमुळे होत आहे. या प्रकरणातील मारेकऱ्यांना शिक्षा देऊन दहशत मोडीत काढण्याचे पहिलं पाऊल उचलावं. याप्रकरणी अनेकांना धमकी आली आहे. मात्र मला धमकी देण्याचे धाडस कोण करत नाही. जर कोणी धमकी देण्याचे धाडस केलं तर पुढे बघू. किंबहुना शरद पवार यांनी या प्रकरणांमध्ये उचललेले पाऊल योग्य आहे. अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी मतदारांना मालक झाला आहात का? असं म्हणणं योग्य नाही. मतदारांसमोर आपण हात जोडून जात असतो त्यांना सन्मान दिला पाहिजे. असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले. 

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje On Devendra Fadanvis : धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे? सगळे घाबरतायत, संभाजीराजे स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सPallavi Saple on HMPV : पुण्यातील  13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होताABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Embed widget