(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravindra Waikar : एकनाथ शिंदे यांचा मोठा डाव, अमोल किर्तीकरांविरुद्ध ठाकरेंचा एकेकाळचा विश्वासू मैदानात उतरवणार, रवींद्र वायकरांना तिकीट?
Ravindra Waikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार रवींद्र वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. ते उत्तर पश्चिममधून निवडणूक लढवतील.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम (Mumbai North West) लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आहेत. गजानन कीर्तिकर सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल होणारे खासदार ठरले होते. तर, रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणारे ठाकरे गटाचे शेवटचे आमदार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून रवींद्र वायकर यांचं नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे गजानन कीर्तिकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली.या बैठकीत जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेच्या उमेदवारांची यादी पुढील दोन दिवसात अधिकृत जाहीर केली जाणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. जोगेश्वरी विधान सभा मतदारसंघातून रविंद्र वायकर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्याआधी ते सलग चारवेळा नगरसेवक म्हणून देखील निवडुण आलेत. रविंद्र वायकर मुंबई महापालिकेचे सलग चार वर्षे स्थायी समिती अध्यक्ष देखील होते.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात आता शिवसेनेचे रविंद्र वायकर विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर असा सामना होणार आहे.
गजानन कीर्तिकर यांचा पत्ता कट
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे गजानन कीर्तिकर हे 13 वे खासदार ठरले होते. गजानन कीर्तिकर यांना जागा वाटपासंदर्भात आक्रमक भूमिका घेत भाजपवर टीका केली होती. काल देखील गजानन कीर्तिकर यांनी संसदेचा ताबा घ्या पण विरोधकांना सन्मान द्या, असं म्हटलं होतं. खिचडी घोटाळ्यातील ईडी चौकशीसंदर्भात देखील गजानन कीर्तिकर यांनी भाष्य केलं होतं. मात्र, आता रवींद्र वायकर यांच्या नावावर मुंबई उत्तर पश्चिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानं गजानन कीर्तिकर यांचा पत्ता कट होऊ शकतो.
अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर लढणार?
गजानन कीर्तिकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. अमोल कीर्तिकर यांना ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. आता एकेकाळी उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेल्या रवींद्र वायकर यांच्याशी त्यांची लढत होईल.
संबंधित बातम्या :
Vishal Patil : विशाल पाटलांची सांगलीत बंडखोरी अटळ? समर्थकांनी पहिल्याच दिवशी घेतले दोन अर्ज