एक्स्प्लोर

Bhandara Crime : मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थींनीकडे शरिरसुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्याला पालकांकडून चोप

Bhandara Crime : मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थींनीकडे शरिरसुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्याला पालकांनी चोप दिलाय.

Bhandara Crime : भंडारा  (Bhandara Crime)  येथील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना परीक्षेत पास होण्यासाठी मार्क वाढवून देण्याचं आमिष दाखवत शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्याला पालकांनी जाब विचारत बेदम चोप दिला. हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या शासकीय नर्सिंग  (Bhandara Crime) महाविद्यालयात घडला. किरण मुरकुट असं पालकांनी बदडलेल्या प्रभारी प्राचार्याचं नावं आहे.

मोबाईलवर लज्जास्पद मॅसेज पाठवून शरीरसुखाची केली मागणी

अधिकची माहिती अशी की, भंडारा  (Bhandara Crime) येथे शासकीय नर्सिंग महाविद्यालय असून इथं 182 प्रशिक्षणार्थी ANM आणि JNM चं प्रशिक्षण घेतात. त्यातील काही विद्यार्थिनींना प्राचार्यांनी परीक्षेत पास करण्यासाठी गुण वाढवून देतो, अशी बतावणी करून काही मुलींना त्यांच्या मोबाईलवर लज्जास्पद मॅसेज पाठवून शरीरसुखाची मागणी केली. त्यातील काही पीडित मुलींनी सदर प्राचार्याची तक्रार त्यांच्या पालकांना केली आणि आज संतप्त पालक नर्सिंग महाविद्यालयात दाखल झालेत. यावेळी पालकांनी प्राचार्याला याबाबत विचारना केली असता त्यांनी उडवाउवीचं उत्तर दिलं आणि संतप्त पालकांचा संताप अनावर झाला आणि थेट त्यांनी प्राचार्याला चांगलाचं चोप दिला. यावेळी पोलिसांनी वेळीच दखल घेत प्राचार्याला ताब्यात घेतलं. 

अहवाल तातडीनं राज्य सरकारकडं पाठविणार असल्याची माहिती 

दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दीपचंद सोयाम यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत नर्सिंग महाविद्यालयाला भेट दिली आणि प्राचार्याला पदावरून तात्काळ हटवत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरिता एका समितीची स्थापना केली आहे. प्राचार्याच्या कक्षाला सील ठोकले आहे. याचा अहवाल तातडीनं राज्य सरकारकडं पाठविणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सोयाम यांनी दिली आहे. दुपारी एक वाजताच्या सुमारास पीडित प्रशिक्षणार्थींना पोलिसांनी भंडारा पोलीस ठाण्यात बयानासाठी बोलावलं असून तब्बल चार तासांपासून त्यांचं बयान नोंदवून प्राचार्य विरोधात विनयभंग आणि इलेक्ट्रॉनिक (मोबाईल) माध्यमाचा दुरुपयोग  (Bhandara Crime) केल्याप्रकरणी कलम 75, 78 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Crime News: विसापुरजवळ 5 वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन; गुन्हा दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Pune Crime : पुण्यातील अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाईAnjali Damania on Beed | गरज नसलेले बंदुकीचे परवाने रद्द करा, पोलीस खात्याचा दुरूपयोग- दमानियाSatish Wagh Pune murder case | सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम Abp MajhaUnique Farmer Id Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार युनिट फार्मर आयडी Abp Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Embed widget