एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अनिकेत कदमने व्यवसाय पहावा, त्याने राजकारणापासून लांब राहावं; रामदास कदमांच्या पुतण्यावर त्यांचे पुत्र काय म्हणाले?

Ramdas Kadam Vs Aniket Kadam : विरोधकांनी आपल्या कुटुंबात भांडण लावलं असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी केला. 

रत्नागिरी : राजकारण म्हणजे थोडी धुसफूस असते, महाराष्ट्रासमोर कौटुंबिक वाद येऊ नये असं वाटतंय. त्यामुळे अनिकेत कदमने व्यवसाय सांभाळावा, त्याने राजकारणापासून लांब रहावं असा सल्ला त्यांचे चुलत बंधू आणि रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी दिला. विरोधकांनी आपल्या कुटुंबात भांडणं लावण्याचं काम सुरू केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला. रामदास कदमांचे पुतणे अनिकेत कदम यांनी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले असून त्यांनी योगेश कदम यांचे विरोधक ठाकरे गटाचे संजय कदम यांचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलंय. 

अनिकेत कदम यांनी राजकारणापासून लांब रहावं

योगेश कदम म्हणाले की, आनिकेत कदम हा माझा चुलत भाऊ आहे. आमचं रक्ताच नात आहे. त्याने कोणाचा प्रचार करावा हा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे.पण तो व्यावसायिक आहे त्याने व्यवसाय पहावा. त्याने राजकारणात  येऊ नये  असे मला वाटतं. तरीही त्याच्या भूमिकेचे स्वागत करतोय. त्याच्या राजकीय भूमिकेचा आमच्या नात्यावर फरक पडणार नाही.

विरोधकांनी कुटुंबात भांडण लावलं

आपल्या विरोधकांनी कुटुंबात भांडण लावल्याचा आरोप करत आमदार योगेश कदम म्हणाले की, आमच्या कुटुंबात वाद लावून विरोधकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या प्रयत्न केला. विरोधकांनी तालुक्यामध्ये, सगळ्या वाड्यांमध्ये भांडण लावणं आणि एक गट आपल्या बाजूने घेण्याचं राजकारण केलं.अडीच तीन वर्षांपूर्वी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूक येतात आणि जातात, रक्ताचं नातं हे कायम राहणार. त्यामुळे मी पुन्हा एकदा आमचे कुटुंब एकत्र यावे यासाठी प्रयत्न करेन.

राज्यात पुन्हा एकदा काका पुतण्या वाद

रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी आता राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत दापोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे मात्र त्यांच्या या निर्धारामुळे काका पुतण्यांमधील संघर्ष कोकणासोबतच संपूर्ण महाराष्ट्राला देखील पाहायला मिळणार आहे.

ही बातमी वाच : 

                                                                       

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget