एक्स्प्लोर

Ratnagiri Vidhansabha Constituency: उदय सामंतांना हरवणारा उमेदवार शोधण्यासाठी मिलिंद नार्वेकर सक्रिय, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात हालचालींना वेग

Maharashtra Politics: उदय सामंत यांच्या विरोधात दिला जाणारा सक्षम उमेदवार नेमका कोण? आणि कोणत्या पक्षातील? कोकणात रंगली 'राजकीय गजाली'. विनायक राऊत यांच्या दौऱ्यानंतर रात्री मिलिंद नार्वेकर देखील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद.

रत्नागिरी: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने राज्यभरात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत कोकणात ठाकरे गटाला मोठा फटका बसला होता. ठाकरे गटाला कोकणातील एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यादृष्टीने ठाकरे गटाने आतापासूनच विधानसभा मतदारसंघांमध्ये (Vidhan Sabha Election 2024) चाचपणी सुरु केली आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघात यंदा ठाकरे गटाने तगडा उमेदवार देण्याची योजना आखली आहे. त्यादृष्टीने विधानपरिषदेतील आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर सक्रिय झाले आहेत. 

उदय सामंत यांच्याविरोधात ठाकरे गटातून कोणता सक्षम उमेदवार देता येईल, यादृष्टीने राजकीय खलबतं सुरु झाली आहेत. उमेदवार पक्षातीलच हवा? का बाहेरून आलेला सक्षम उमेदवार देखील स्वीकारला जाईल? यावर ठाकरे गटात मंथन सुरु आहे. रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत ठाकरे गटात सर्व शक्यतांवर चर्चा केली जात असल्याची माहिती आहे. 

विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात उदय सांबंधी यांच्या विरोधात सक्षम उमेदवाराचा शोध आणि सर्व शक्यतांची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शिवसेनेचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा केली. यावेळी उमेदवार पक्षातीलच हवा? की इतर पक्षातील सक्षम उमेदवार देखील चालेल का? यावर देखील मंथन झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान विनायक राऊत यांच्यानंतर कोकणच्या दौऱ्यावरती असलेले मिलिंद नार्वेकर देखील आज रात्री पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून आढावा घेणार आहेत. शिवसेना ठाकरे गटात रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघांमध्ये इतर पक्षातून आयात केला जाणारा उमेदवार नेमका कोण असणार? याबाबत सध्या वेगवेगळी नावं आणि चर्चा सुरु झाल्या आहेत.

विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता

राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळी संपल्यानंतर  राज्यात लगेच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊ शकते. त्यानंतर 14 किंवा 15 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ शकतो. त्यानंतर 26 नोव्हेंबरपूर्वी राज्यात नवे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 10 ऑक्टोबरनंतर लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती सरकार आणखी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार, हे पाहावे लागेल. 

आणखी वाचा

मोठी बातमी: विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचा अंतर्गत सर्व्हे, 177 जागांवर अनुकूल परिस्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget