एक्स्प्लोर

Refinery Project: केवळ बारसूच नको तर नाणारमध्ये देखील रिफायनरी करा; समर्थकांची प्रशासनासोबतच्या बैठकीत मागणी

Refinery Project: रत्नागिरीतील रिफायनरी समर्थकांनी केवळ बारसू नव्हे तर नाणारमध्येही रिफायनरी उभी करावी अशी मागणी केली आहे.

Refinery Project:  रत्नागिरीतील बारसूमध्ये प्रस्तावित असलेल्या रिफायनरीला स्थानिकांकडून मोठा विरोध सुरू असताना दुसरीकडे आता रिफायनरी समर्थकही प्रकल्पासाठी अधिकच आक्रमकपणे मागणी रेटत असल्याचे दिसून येत आहे. केवळ बारसुच नको तर नाणारमध्ये देखील रिफायनरी करा, अशी आग्रही मागणी रिफायनरी समर्थकांनी आज प्रशासनाकडे केली आहे. रिफायनरीबाबत प्रशासनाने बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी समर्थकांनी आपली भूमिका मांडली. 

राजापूरमध्ये प्रशासनाने बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी रिफायनरी समर्थकांनी मोठी मागणी केली. नाणार आणि बारसू असे मिळून रिफायनरी करा अशी मागणी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी रिफायनरी समर्थकांनी बोलताना केवळ बारसूच नको तर यापूर्वी रद्द झालेल्या नाणार येथील जागा देखील रिफायनरीसाठी घेण्यात यावी. त्यामुळे रिफायनरीची क्षमता वाढेल अशी मागणी यावेळी चर्चेदरम्यान करण्यात आली. म्हणजेच बारसू इथं  20 दशलक्ष इतक्या क्षमतेची रिफायनरी उभारली जाणार आहे. पण नाणार येथील जागा घेतल्यास 60 दशलक्ष इतक्या क्षमतेची रिफायनरी उभारली जाईल. त्यामुळे केवळ बारसूच नाही तर नाणार येते उपलब्ध असलेली 8500 हजार एकर जागा देखील रिफायनरीसाठी घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बोरिंग मारण्याच्या कामाला वेग

बारसूच्या सड्यावर सलग तिसऱ्या दिवशी बोरिंग मारण्याचा काम युद्धपातळीवर सुरू आहे. आजही सड्यावर माती परीक्षणासाठी लागणाऱ्या बोरिंग मारल्या जात आहे. बोरिंग मारण्याचे काम लवकरात लवकर संपवावं अशा पद्धतीचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून एमआयडीसी विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता बोरिंग मारण्याच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय

रिफायनरीविरोधात ग्रामस्थ आक्रमक

सोमवार, 24 एप्रिलपासून रिफायनरीसाठी माती सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. या सर्वेक्षणाला बारसू सोलगाव आणि जवळपासच्या स्थानिकांनी जोरदार विरोध केला. स्थानिकांचा विरोध मोडून काढण्यासाठी मोठा फौजफाटा लावण्यात आला होता. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, रिफायनरी विरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण आणि मंगेश चव्हाण पोलिसांनी अटक केली. तर, अन्य नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या. तरीदेखील ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Embed widget