(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : दऱ्या खोऱ्यातून फेसाळणारा चिपळूणचा पांढराशुभ्र सवतसडा धबधबा, पर्यटकांचं खास आकर्षण
Chiplun waterfall : पावसाळ्यात कोकणात जाताना सह्याद्रीच्या डोंगारातून नागमोडी वळणाचा महामार्गावरील प्रवास म्हणजे एक पर्वणीच. हिरवाईने नटलेल्या या सह्याद्रीचे रुप पावसामुळे अधिकच खुलून जातं. त्यामुळं पर्यटकांची पावलं कोकणाकडे आपसूक वळतात.
रत्नागिरी : सध्या कोकणात सर्वत्रच पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसामुळे महामार्गावरून कोकणात प्रवास करताना कोकणचं सौदर्य अधिकच खुलून दिसतं. या प्रवासात दऱ्या खोऱ्यांतून फेसळणारे धबधबे (waterfall) नेहमीच लक्ष वेधी असतात. अशाच प्रकारचा मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण (Chiplun ) नजीकचा सवतसडा धबधबा पर्यटकांना खुणावतोय.
पावसाळ्यात कोकणात जाताना सह्याद्रीच्या डोंगारातून नागमोडी वळणाचा महामार्गावरील प्रवास म्हणजे एक पर्वणीच. हिरवाईने नटलेल्या या सह्याद्रीचे रुप पावसामुळे अधिकच खुलून जातं. त्यामुळं पर्यटकांची पावलं कोकणाकडे आपसूक वळतात. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना नजरेस पडतो काळ्याभोर सह्याद्रीच्या कडेकपारीतून उंचावरून फेसाळणारा पांढराशुभ्र सवतसडा धबधबा. या धबधब्याचे विलोभनीय दृश्य पाहून महामार्गावरील प्रवास करणारा प्रवासी तीथे थांबतो आणि त्याचा मनमुराद आनंद घेतो.
चिपळूनमधील सवतसडा धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हौशी पर्यटकांसाठी हा धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. अनेक पर्यटक येथे येत आहेत.
हिरव्यागार दाट गर्द झाडीतून सवतसडा धबधब्याची विलोभनीय दृष्यं आपल्या मनाला आकर्षित करतात. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे पावसाळी पर्यटक मौज मज्जा करण्यासाठी बाहेर पडले नाहीत. पण आता पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे या फेसाळणाऱ्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
चिपळूणच्या सौंदर्यात आणखी एक भर टाकणारं ठिकाण म्हणजे अडरे गावचं धरण. या सवतसडा धबधब्याचा आनंद घेऊन पर्यटक अडरे धरणाच्या दिशेने वळतात. हे धरण सध्या ओलांडून वाहत आहे.
या धरणाच्या एका बाजूला पर्यटकांसाठी खास टेप्स बांधल्यामुळे त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात पोहण्याचा आणि भिजण्याचा मनमुराद आनंद पर्यटक घेत असतात.
महत्वाच्या बातम्या