एक्स्प्लोर

Nashik Bhivtas Waterfall : एक हजार फुटांवरून कोसळणारा भिवतास धबधबा, सुरगाण्याचे डोळ्यांत भरणार निसर्ग सौंदर्य

Nashik Bhivtas WaterFall : सुरगाणा (Surgana) तालुक्यातील 01 हजार फुटांवरून कोसळणारा भिवतास धबधबा (Bhivtas Waterfall) पर्यटकांना खुणावतो आहे.

Nashik Bhivtas WaterFall : नाशिक (Nashik) जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), सुरगाणा, पेठ आदी तालुक्यांसह इतरही परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आता पावसाळयात हेच निसर्ग सौंदर्य अगदी खुलून गेले आहे. अनेक धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. अशातच दुर्लक्षित पण प्रसिद्धीस येत असलेला सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. 

नाशिक जिल्ह्याला (Nashik District) निसर्गाने भरभरून दिले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांची पर्यटनस्थळी झुंबड उडालेली असते. नाशिक ग्रामीण भागात हळूहळू पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. त्यामुळे दुर्लक्षित असलेली पर्यटनस्थळे दृष्टीपथात येत आहेत. यातीलच एक डोळ्याचं पारणं फेडणारा धबधबा म्हणजे भिवतास धबधबा होय. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील खोकर विहीर या गावाजवळ हा धबधबा पाहायला मिळतो. भिवतास हे ठिकाण सुरगाणा तालुक्यातील केळावण, खोकरविहीर, अबोडा पसिसरात आहे. येथे नदीच्या पाण्यातून कोसळनारा धबधबा असून हा धबधबा सुमारे 1000 फुट खोल खाली कोसळतो. या धबधब्याची भुरळ अनेकांना असून पावसाळी वातावरणामुळे तो अनेकांना खुनावत आहे.

गेल्या चार दिवसंपासून नाशिक शहर व जिल्ह्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्वच लहान मोठी धरणे व तलाव भरून वाहत आहेत. त्याचबरोबर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण व नजीकच्या तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमधमेश्वर, दारणा यासह जवळपास 18 धरणे भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निसर्ग रम्य वातावरणामुळे परिसर आल्हाददायक आणि प्रसन्न वाटतो. येथे गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटक भेटी देत असतात. हा धबधबा नाशिकपासून सुमारे 90 किलाेमीटर अंतरावर आहे. सुरगाण्यापासून 50 किलाेमीटरवर हा धबधबा असल्याने पर्यटकांची माेठ्या संख्येने गर्दी हाेते. याठिकाणी ग्रामीण पाेलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सुचना देण्यात आल्या आहेत.

धबधब्याचे रुप आकर्षक
सुरगाणा, पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यातील अनेक धबधबे पाण्याने ओसंडून वाहत आहे. यामध्येच सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधब्याने आकर्षक रूप धारण केल्याने परिसरातील पर्यटकांना त्याची भुरळ पडले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमारेषेवर असलेल्या या धबधब्याच्या आकर्षक रूप बघण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होऊ लागली आहे. या धबधब्याला जाण्यासाठी पर्यटकांना ग्रामीण भागातून जावे लागत असून यामध्ये कोणी स्टंटबाजी करू नये असल्याने धोक्याचे वळण असल्याने वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा अशा प्रकारच्या सूचना पोलीस यंत्रणा कडून दिल्या जात आहे. 

विकासापासून वंचित 
भिवंतास धबधब्याजवळ परेटी डोह, हंडाहंडी डोह अतिशय सुंदर असून, दोन्ही बाजूचा परिसर अतिशय नयनरम्य आहे. अलीकडे प्रकाशझोतात आलेला भिवंतास धबधबा मात्र विकासापासून आजही वंचित आहे. जर प्रशासन आणि लोकप्रतिनींधीनी या अप्रतिम निर्सगाचा ठेवा असलेल्या धबधब्याकडे लक्ष देऊन सुधारणा केली तर सदर परिसर सुजलाम् सुफलाम् होऊन एक सुंदर असे पर्यटन स्थळ होऊन परिसरातील नागरिकांना रोजगार निर्मिती होईल, अशी मागणी होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Embed widget