एक्स्प्लोर

Ratan Tata Death: जिवलग मैत्री, खांद्यावर हात अन् बरंच काही...; रतन टाटांच्या निधनानंतर शांतनू भावूक, म्हणाला 'गुडबाय, माय डियर लाईटहाऊस'

Ratan Tata Death: रतन टाटांच्या जाण्यानं मैत्रीत पोकळी निर्माण झाली, असं शांतनूने सांगितले. 

Ratan Tata Death: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे वयाच्या 86 वर्षी निधन झालं. आज (गुरूवारी) दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. रतन टाटा यांचे स्वीय सहाय्यक शांतनू नायडू (Shantanu Naidu) याने देखील सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रतन टाटांच्या जाण्यानं मैत्रीत पोकळी निर्माण झाली, असं शांतनूने सांगितले. 

शांतनू नेमकं काय म्हणाला? (Shantanu Naidu On Ratan Tata)

रतन टाटांसोबतच्या मैत्रीने मला खूप काही दिलं. त्यांच्या जाण्याने या मैत्रीत आता पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन. प्रेमाची किंमत दु:ख ही आहे. गुडबाय, माय लाईटहाऊलस…, अशी भावूक पोस्ट शांतनूने केली आहे.
Ratan Tata Death: जिवलग मैत्री, खांद्यावर हात अन् बरंच काही...; रतन टाटांच्या निधनानंतर शांतनू भावूक, म्हणाला 'गुडबाय, माय डियर लाईटहाऊस

कोण आहे शांतनू नायडू?

शांतनू याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्याचा जन्म 1993 मध्ये पुणे येथे झाला. खुद्द रतन टाटा यांनी फोन करुन, तू माझ्याबरोबर काम करणार का? अशी विचारणा शांतनूला केली होती. अनेकदा नवीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ले रतन टाटा शांतनूकडून घेतात, असेही सांगितले जाते. भटक्या श्वानांसाठी केलेल्या कामामुळे रतन टाटा यांची शांतनूसोबत जवळीक वाढली. शांतनूच्या कामाने टाटा खूप प्रभावित झाले होते. 2018 पासून रतन टाटा यांच्यासोबत शांतनू काम करत आहे. शांतनू नायडू याची गुडफेलोज ही कंपनी आहे. या कंपनीचा संस्थापक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी ही कंपनी कार्यरत असते. गुडफेलोज या कंपनीचे मूल्य पाच कोटीपेक्षा जास्त आहे. यामध्ये रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली आहे.

रतन टाटा यांची कारकीर्द-

- जन्म - 28 डिसेंबर 1937, वय 86 वर्ष

- 1961-62 टाटा स्टीलमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून रुजू

1991 मध्ये टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी, जेआरडी टाटांनी पद सोपवलं

- चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली 

- 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची 'इंडिका' कार टाटा मोटर्सने बनवली (रतन टाटांचं स्वप्न पूर्ण)

- एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना सुचली

- 2008 मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली

- 2012 मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा, सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला

- मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी

- नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन

- रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत.

संबंधित बातमी:

Ratan Tata Death: रतन टाटा यांच्या मृत्यूचं नेमकं कारण आलं समोर; द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी हरपला, संपूर्ण देश हळहळला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 December 2024Eknath Shinde Varsha Banglow | वर्षा बंगला सोडून एकनाथ शिंदे आता मुक्तागिरी बंगल्यात राहायला जाणारRahul Gandhi On BJP : संविधान रक्षणावर भाजपवाले बोलतात तेव्हा सावरकरांचा अपमान करतातAllu Arjun PC After Bail '  अटक... जेल...जामीन...पुष्पाची पहिली पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Rahul Gandhi : पेपरलीक, मक्तेदारी करा, अग्निवीर असावेत, देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत, असं संविधानात लिहिलेलं नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
पेपरलीक, मक्तेदारी करा, अग्निवीर असावेत, देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत, असं संविधानात लिहिलेलं नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget