एक्स्प्लोर

Ratan Tata Death: रतन टाटा यांच्या मृत्यूचं नेमकं कारण आलं समोर; द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी हरपला, संपूर्ण देश हळहळला!

Ratan Tata Death: रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती.

Ratan Tata Death: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा-तोटा न पाहणारा उद्योगपती म्हणून रतन टाटा (Ratan Tata) यांची ओळख होती. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देणारं, देसशेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. रतन टाटा यांच्याबद्दल देशातील जनतेला वेगळीच आपुलकी होती. टाटा कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांनी लाखो कुटुंबाना आपलंसं केलं होतं. देशभक्ती व देशहिताचं आदर्श उदाहरण म्हणजे रतन टाटा असंही बोललं जायचं. 

रतन टाटा यांचा मृत्यू कशामुळे?

रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यामुळे मुंबईतील ब्रीड कँडी रुग्णालयात रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते. रतन टाटा यांना सोमवारी (7 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

रतन टाटा यांची कारकीर्द-

- जन्म - 28 डिसेंबर 1937, वय 86 वर्ष

- 1961-62 टाटा स्टीलमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून रुजू

1991 मध्ये टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी, जेआरडी टाटांनी पद सोपवलं

- चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली 

- 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची 'इंडिका' कार टाटा मोटर्सने बनवली (रतन टाटांचं स्वप्न पूर्ण)

- एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना सुचली

- 2008 मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली

- 2012 मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा, सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला

- मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी

- नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन

- रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत.

संबंधित बातमी:

Ratan Tata: दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल बाहेर चणे-फुटाणे विकणारे जखमी झाले; प्रत्येकाला शोधून शोधून रतन टाटांनी केली मदत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 06 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्सCM Fadanvis On Eknath Shinde : गृहखात्याविषयी रस्सीखेच नव्हती, शिंदे नाराज नाहीत - फडणवीसUday Samant On Mahayuti : एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपदं देतील- उदय सामंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 
Maharashtra Weather Update: दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Embed widget