एक्स्प्लोर

Ratan Tata: दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल बाहेर चणे-फुटाणे विकणारे जखमी झाले; प्रत्येकाला शोधून शोधून रतन टाटांनी केली मदत

Ratan Tata Death: रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे.

Ratan Tata Death News: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी दिर्घ आजारानं त्याचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जातेय. औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देणारं, देसशेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना अनेक दिग्गजांनी व्यक्त केल्या आहेत. 

द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा-तोटा न पाहणारा उद्योगपती म्हणून रतन टाटा (Ratan Tata) यांची ओळख होती. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. कर्मचाऱ्यांचं अधिकाधिक कल्याण कसं करता येईल यासाठी रतन टाटा नेहमीच प्रयत्नशील असायचे. व्यावसाय करताना समाजाचा विसर पडता कामा नये, असं ते नेहमी सांगायचे. रतन टाटा यांच्या काही आठवणी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी सांगितल्या. 

आदर्श, शालीन उद्योगपती हरपला.  समाज्याच्या गरजा लक्षात घेत टाटा समुहाचा विस्तार केला. रतन टाटा यांच्या काळापासून टाटा हा ब्रँड उदयास आला, असं गिरीश कुबेर म्हणाले. तसेच  26/11 हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक फेरीवाल्यांना महागड्या रुग्णालयांमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार केले. यामध्ये ताज हॉटेलबाहेर चणे-फुटाणे विकणाऱ्यांचा देखील समावेश होता. रतन टाटा यांच्या आदेशानंतर टाटा समुहाने दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या फेरीवाल्यांना शोधून शोधून त्यांच्या घरी जाऊन मदत केली, अशी एक आठवण गिरीश कुबेर यांनी सांगितली. 

पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये झाला. 1962 मध्ये ते टाटा समूहात रुजू झाले. 1991 मध्ये त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. भारत सरकारने रतन टाटा यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या देशातील दोन सर्वोच्च सन्मानांनी सन्मानित केले. राष्ट्र उभारणीतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.

एक सामान्य कर्मचारी म्हणून 1961-62 मध्ये रुजू-

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. एक सामान्य कर्मचारी म्हणून 1961-62 मध्ये रुजू झाले. त्यानंतर जेआरडी टाटांनी त्यांना  टाटा ग्रुपचं चेअरमनपद सोपवलं. चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली. 1998मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची 'इंडिका' कार टाटा मोटर्सने बनवली. त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पनाही रतन टाटा यांना सुचली. टाटांच्या मार्गदर्शनात 2008मध्ये रतन टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली. त्यांनी 2012मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा दिला आणि सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला. मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी ते आले. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन आहेत. रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत

संबंधित बातमी:

Ratan Tata Passed Away : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संबंधित व्हिडीओ:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
Ratan Tata:'ती' बातमी कळताच JRD  संतापले, रतन टाटांना चांगलंच खडसावलं; स्वत:च्याच कंपनीत काम करण्यासाठी करावा लागला बायोडाटा
'ती' बातमी कळताच JRD संतापले, रतन टाटांना चांगलंच खडसावलं; स्वत:च्याच कंपनीत काम करण्यासाठी करावा लागला बायोडाटा
PETA Letter To Salman Khan : बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Niranjan Hiranandani on Ratan Tata :  रतन टाटांकडून त्यांच्या जगण्यातला साधेपणा शिकण्यासारखा होताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 10 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSuhas Kande vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्यास कधीही, कुठेही तयारMukesh Ambani Tribute To Ratan Tata : भारत आणि देशातील उद्योग जगतासाठी दु:खाचा दिवस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
Ratan Tata:'ती' बातमी कळताच JRD  संतापले, रतन टाटांना चांगलंच खडसावलं; स्वत:च्याच कंपनीत काम करण्यासाठी करावा लागला बायोडाटा
'ती' बातमी कळताच JRD संतापले, रतन टाटांना चांगलंच खडसावलं; स्वत:च्याच कंपनीत काम करण्यासाठी करावा लागला बायोडाटा
PETA Letter To Salman Khan : बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Suhas Kande : समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, निवडणुकीत त्यांना पाडू शकतो, सुहास कांदेंचं आव्हान, महायुतीत वादाची ठिणगी
पंकज आणि समीर भुजबळ राजकीय दृष्ट्या छोटे, छगन भुजबळांनीचं माझ्यासमोर निवडणूक लढवावी : सुहास कांदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Embed widget