Ranbir Kapoor : किशोर कुमार यांच्या जीवनावर आधारित सिनेमात रणबीर साकारणार प्रमुख भूमिका; सौरव गांगुलीच्या बायोपिकबद्दल म्हणाला...
Ranbir Kapoor : 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान रणबीर कपूरने आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे.
![Ranbir Kapoor : किशोर कुमार यांच्या जीवनावर आधारित सिनेमात रणबीर साकारणार प्रमुख भूमिका; सौरव गांगुलीच्या बायोपिकबद्दल म्हणाला... Ranbir Kapoor talks about Sourav Ganguly biopic confirms working on Kishore Kumar biopic Ranbir Kapoor : किशोर कुमार यांच्या जीवनावर आधारित सिनेमात रणबीर साकारणार प्रमुख भूमिका; सौरव गांगुलीच्या बायोपिकबद्दल म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/906e618a75f18b4bc7999ff94be8ff8c1677488718763254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ranbir Kapoor Kishore Kumar Biopic : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनदरम्यान तो भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार सौरव गांगुलीसोबत (Sourav Ganguly) क्रिकेट खेळताना दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर झळकणार असल्याची चर्चा आहे. आता प्रमोशनदरम्यान रणबीरने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
सौरव गांगुलीच्या बायोपिकची विचारणा झालेली नाही : रणबीर कपूर
रणबीर कपूर म्हणाला की, "सौरव गांगुली दादचं कतृत्व देशासह जगभरातील मंडळींना माहित आहे. त्यामुळे त्यांचा बायोपिक खूपच खास असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सिनेमासाठी मला विचारणा झालेली नाही. सौरव गांगुली यांच्या बायोपिकवर सध्या निर्माते काम करत असल्याची शक्यता आहे."
View this post on Instagram
किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये रणबीर मुख्य भूमिकेत झळकणार!
किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. गेल्या 11 वर्षांपासून तो या सिनेमावर काम करत आहे. रणबीर म्हणाला की, "गेल्या 11 वर्षांपासून मी किशोर कुमार यांच्या बायोपिकवर काम करत आहे. अनुराग बासु यांनी या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे. माझी दुसरी बायोपिक सौरव गांगुली यांची असू शकते. पण अद्याप यासंदर्भात मला विचारणा झालेली नाही".
पाकिस्तानी सिनेमात काम करण्याबद्दल रणबीर म्हणाला की, "सिनेमा माझ्या आवडीची गोष्ट आहे. सिनेमा ही एक कला आहे आणि कलेला देशाचं बंधन नसतं. एखाद्या सिनेमासाठी मला विचारणा झाली आणि त्या सिनेमाचं कथानक चांगलं असेल तर मी नक्कीच त्या सिनेमाचा विचार करेल".
रणबीरचे आगामी प्रोजेक्ट
रणबीर कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव रंजनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात रणबीर श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. हा सिनेमा 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच त्याचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)