एक्स्प्लोर
'राजीव गांधींऐवजी महात्मा फुले जन आरोग्य योजना', आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदलून आता महात्मा फुले जन आरोग्य योजना ठेवलं जाणार आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ही घोषणा केली आहे. तसेच याशिवाय बाळासाहेब ठाकरे विमा योजना सुरु करण्यात येणार आहे. 20 नोव्हेंबर 2016 रोजी राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत संपते आहे. त्यामुळे आता नव्यानं ही योजना सुरु होणार आहे. नव्या योजनेमध्ये किडनी ट्रान्सप्लांटसह एक हजार 34 नव्या शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. अशी माहितीही दीपक सावंत यांनी दिली आहे. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्याना ही योजना असणार आहे. याशिवाय बाळासाहेब ठाकरे विमा योजना सुरु करण्यात येणार आहे. ज्यामध्ये अपघातग्रस्तांना तीन दिवस मोफत उपचार मिळणार आहेत. लवकरच ही योजना घोषित होणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
राजकारण























