एक्स्प्लोर

Nagpur : शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग कागदावरच, फक्त 3165 इमारतींची मनपाला साथ

'रेन वॉटर हार्वेस्टिंग' यंत्रणा उभारणाऱ्यांना 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेची पुढे अंमलबजावणी झालीच नाही. लोकांनीही यासाठी आग्रही भूमिका घेतली नाही.

नागपूरः तीस लाखांवर लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात फक्त 3 हजार 165 इमारतींमध्ये  रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले असून मनपा जनजागृती आणि प्रोत्साहन देण्यास निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे. शहरातील एक टक्के नागरिकांनीही जलसंवर्धनात पुढाकार घेतला नसल्याचे उदासीन चित्र आहे.

नागपूरात सिमेंटच्या बहुमजली इमारती तयार झाल्या. मुख्य रस्त्यांसह वस्त्यांमध्येही सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले गेले. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची जागाच नाही. राज्य सरकारने रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. परंतु महानगरपालिकेने आदेश गुंडाळून ठेवल्याचे दिसते. शहरातील इमारतींची संख्या बघता केवळ अर्धा टक्के नागरिकांनीच जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार न घेतल्यास शहराची भूजल पातळीत प्रचंड घट होऊन स्थिती लातूरसारखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सवलत निर्णय फक्त कागदावरच

रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणाऱ्यांना 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेची पुढे अंमलबजावणी झालीच नाही. लोकांनीही यासाठी आग्रही भूमिका घेतली नाही. मनपा प्रशासनासोबतच पदाधिकारीही उदासीन असल्याने सवलत जाहीर करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

प्रथमच दिवसाआड पाणीपुरवठा

2019मध्ये पेंच प्रकल्पात पुरेसा जलसाठा नसल्याने नागपूर शहराला प्रथमच दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता. यातून नागरिकांनी व प्रशासनाने धडा घेण्याची गरज होती. मात्र नागरिकांत 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची संकल्पना राबविण्याबाबत कमालीची उदासिनता दिसून येते. विशेष म्हणजे यासाठी महानगरपालिकेकडूनही कुठलीही जनजागृती किंवा नागरिकांना सक्ती केली जात नाही. त्यामुळे आजही उन्हाळ्यात अनेक भागातील विहिरी, बोअरवेल कोरड्या होत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. महानगरपालिकेची उदासिनता कायम राहील्यास शहराची भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिसूचनेकडे दुर्लक्ष

आधीच्या काळात छोटे-छोटे तलाव निर्माण करून त्यात पावसाचे पाणी साठविले जायचे. साठलेले पाणी जमिनीत झिरपल्याने भूजल पातळी वाढायची. आता सगळीकडे सिमेंटीकरण झाल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग महत्त्वाचे आहे. राज्य सरकारनेही 6 जून 2007 मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबत अधिसूचना काढली. परंतु याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले.

एक टक्के घरी यंत्रणा नाही

2007च्या राज्य सरकारच्या अधिसूचनेची परिणामकारक अंमलबजावणी होत नसल्याने पुन्हा 15 जून 2016 रोजी अधिसूचना काढली अन् महापालिकांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. परंतु महापालिकेने राज्य शासनाचे निर्देशच धुडकावल्याचे चित्र आहे. शहरात 6 लाख 22 हजार घरांची नोंद असून आतापर्यंत जेमतेम 3165 लोकांनीच ही यंत्रणा उभारली आहे. म्हणजेच एक टक्का नागरिकांनीही रेन वॉटर हार्वेस्टिंग केले नाही.

झोन निहाय आकडेवारी

झोन इमारती
लक्ष्मीनगर झोन 630
धरमपेठ झोन 116
हनुमाननगर झोन 718
धंतोली झोन 685
नेहरूनगर झोन 435
गांधीबाग झोन 36
सतरंजीपुरा झोन 19
लकडगंज झोन  135
आशीनगर झोन 75
मंगळवारी झोन 316
एकूण 3165

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
Horoscope Today 10 August 2026 : आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget