Raigad Latest News : खोपोलीत अनोखं रेस्क्यू ऑपरेशन, सहा फूट अजगराला 60 फूट उंचीवरुन वाचवलं
Raigad python Latest News : एखादं सहा फूट अजगर (python), 60 फूट उंचीवर चढलेलं तुम्ही ऐकलं अथवा पाहिलं आहे का? त्यातच तो अजगर सुमारे 100 किव्ही विजेच्या टॉवरवर चढला असेल तर
Raigad python Latest News : एखादं सहा फूट अजगर (python), 60 फूट उंचीवर चढलेलं तुम्ही ऐकलं अथवा पाहिलं आहे का? त्यातच तो अजगर सुमारे 100 किव्ही विजेच्या टॉवरवर चढला असेल तर ... रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे अशाच एका अजगराची सुखरूप सुटका करण्यात आली. सहा फूट लांबीच्या अजगराची सुटका सर्पमित्र आणि अग्निशमन दलाच्या (fire brigade, Rescue Team) मदतीने खोपोली (raigad khopoli) येथे करण्यात आली.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास खोपोली येथील महिंद्रा सॅनियो कंपनीतील पॉवर स्टेशनच्या आवारात एक अजगर जातीचा साप हा 100 केव्हीच्या टॉवरवर चढताना कामगारांना दिसला होता. बुधवारी सकाळच्या सुमारास याच ठिकाणी कावळे या अजगराला टोचत असल्याचे दिसून आले. यावेळी, वीज कर्मचाऱ्यांनी खोपोली येथील गुरुनाथ साठीलकर आणि सर्पमित्रांना कळविले. त्यांनी तात्काळ धाव घेत पाहणी केली. त्या अजगराला खाली उतरणे शक्य होत नसल्याचे दिसून आले. तो अजगर विजेच्या तब्बल 60 फूट उंचीच्या टॉवरवर असल्याचे दिसून आले. तर, विजेच्या टॉवरवर असलेल्या अजगराला खाली सुखरूप आणणे जिकरीचे असल्याचे अमोल ठकेकर आणि दिनेश ओसवाल या सर्पमित्रांनी यांना जाणीव झाली. याच दरम्यान अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले होते. यामुळे, अजगराचे प्राण वाचविण्यासाठी वीज पुरवठा देखील बंद करण्यात आला.
त्यानंतर, सुमारे दोन ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या मदतीने वॉटरगनच्या मदतीने पाण्याचा मारा करून अजगराला खाली उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी, अजगराने हालचाल केल्याने तो विजेच्या टॉवरवरून खाली कोसळल्याने आठ ते दहा सर्पमित्रांच्या मदतीने त्याला प्लास्टिकच्या ताडपत्रीच्या मदतीने अलगद झेलण्यात आले. यामुळे, सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर विजेच्या टॉवरवर सुमारे 60 फूट उंचीवर अडकलेल्या सहा फूट लांबीच्या अजगराची सुखरूप सुटका करण्यात आल्याने सर्पमित्र आणि अग्निशमन दलाच्या मदतीने एक अविस्मरणीय रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.