उरण येथील गोडाऊनमधील गव्हाच्या साठ्याची तपासणी, काळाबाजर होत असल्याचा संशय
Uran: नवी मुंबई पोलीसांनी उरण मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबई पोलीसांनी केलेल्या कारवाईमध्ये उरण तालुक्यातील जासई येथील गोडाऊनमध्ये हजारो टन गव्हाचा साठा आढळून आला आहे.
Uran: नवी मुंबई पोलीसांनी उरण मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबई पोलीसांनी केलेल्या कारवाईमध्ये उरण तालुक्यातील जासई येथील गोडाऊनमध्ये हजारो टन गव्हाचा साठा आढळून आला आहे. हा गव्हाचा साठा या गोडाऊनमध्ये कुठून आला, याची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात येत आहे.
उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात आयात आणि निर्यात करण्यात येत असून या परिसरात अनेक गोडाऊन्स उभारण्यात आले आहेत. दरम्यान शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास नवी मुंबई पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार जासई ते गव्हाण फाटा दरम्यान असलेल्या इनलाईन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार, उरण पोलीसांनी कारवाई करीत शहानिशा केली. यातच पोलिसांना या गोडाऊनमध्ये हजारो टन गव्हाचा साठा असून तो निर्यात करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली असता उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी असलेल्या गव्हाच्या साठ्याची आणि कागदपत्रांची तपासणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
यावेळी या ठिकाणी असलेल्या चार गोडाऊन्समध्ये गव्हाचा साठा आढळून आला असून तो हैद्राबाद, कर्नाटक, पंजाब, हरियाणा अशा राज्यांमधून आला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या गोडाऊनमध्ये आढळून आलेले गहू हे रेशनिंगसाठी वापरण्यात येत असून त्याचा काळाबाजर करून ते वाढीव दरात निर्यात करण्यात येत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून हे गोडाऊन सुरू असून देशातील विविध भागांतील शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून निर्यात करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या संपूर्ण मालाच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावरच या संदर्भात माहिती देणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर हे गोडाऊन अधिकृत की अनधिकृत याची शहानिशा होणे गरजेचे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप
Bhagat Singh Koshyari : एक राज्यपाल आणि 10 वाद ! कधी ठाकरेंशी पंगा तर कधी महात्मा फुलेंवरुन वादग्रस्त वक्तव्य