एक्स्प्लोर

Bharat Gogawale : आधी मंत्रिपद हुकलं, आता भरत गोगावलेंचे ST महामंडळ अध्यक्षपदही लांबणीवर; कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

Bharat Gogawale ST Mahamandal : थोड्या दिवसांसाठी कशाला अडकून राहायचं, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी दिलीय. 

रायगड : महायुती सरकार सत्तेतून आल्यापासून मंत्रिपदाने सातत्याने हुलकावणी दिलेल्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचं एसटी महामंडळ अध्यक्षपदही आता लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालंय. आता थोड्या दिवसांसाठी यामध्ये कशाला अडकून बसायचं, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले महामंडळपद भरत गोगावले स्वीकारणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

राज्याच्या विधानसभा निवडणुका या काहीच दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. नेमकी तेच लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट, आनंदराव आडसुळ आणि माजी खासदार हेमंत पाटील यांची महामंडळावर वर्णी लावली. त्यानंतर आमदार भरत गोगावलेंनाही एसटी महामंडळपद देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या गोगावलेंनी मात्र त्यावर विचार करू असा मेसेज दिल्याने त्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. 

कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

मंत्रिपद अपेक्षित असताना भरत गोगावलेंना एक-दीड महिन्यासाठी महामंडळ देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा मुख्यमंत्र्यांडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. त्यावर भरत गोगावलेंनीही काहीशी नाराजी व्यक्त केल्याचं दिसतंय. 

कार्यकर्त्यांशी चर्चा करून अध्यक्ष ST महामंडळाचे पद स्वीकारण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. भरत गोगावले म्हणाले की, महामंडळ मिळावं ही आमची मागणी नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी मनधरणी केली. तसा जीआर काढला, ऑर्डरही काढलीय. आम्ही पक्षाच्या वाढीसाठी काम करत होतो. थोड्या दिवसांसाठी कशासाठी यामध्ये अडकून बसायचं असा विचार आहे. एसटी महामंडळ स्वीकारायचं की नाही याबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. 

मंत्रिपदाने हुलकावणी दिली ती दिलीच

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना साथ दिली. शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांचे नाव जवळपास निश्चित होतं. पण काही कारणामुळे त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता आली नव्हती. पुढच्या विस्तारात त्यांना संधी देण्याचा शब्द देण्यात आला होता. पण त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवारांच्या मंत्र्यांनी शपथ घेतली आणि भरत गोगावलेंना मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली. 

ही बातमी वाचा: 

                                                      

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
Ratnagiri : रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Embed widget