अलिबागच्या समुद्रानं दोन जणांना केलं गिळंकृत, शोधमोहिम सुरु, नेमकी कशी घडली घटना?
अलिबाग समुद्रात धक्कादायक घटना घडली आहे. पोहत असताना दोन जण अलिबागमधील अरबी समुद्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
Alibaug News : अलिबाग समुद्रात धक्कादायक घटना घडली आहे. पोहत असताना दोन जण अलिबागमधील अरबी समुद्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. अलिबाग समुद्राने दोघांनांही गिळंकृत केलं आहे. बुडालेली दोन्ही तरुण हे नवी मुंबईचे आहेत. शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. पोलिसांकडून शोध मोहीम सुरूच आहे. तहसीलदार विक्रम पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
नेमकी कशी घडली घटना? शोधमोहिम सुरु
अलिबाग समुद्रात बुडून दोन युवक बेपत्ता झाले आहेत. खूप वेळापासून या बुडालेल्या दोघांचा शोध सुरु आहे. ड्रोन आणि बॅटरीच्या मदतीने पोलिस यंत्रणा आणि जीवरक्षक यांच्याकडून शोध सुरु आहे.
बुडालेल्या पैकी एकजण उरण येथील तर दुसरा सानपाडा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. उरण नवी मुंबई परिसरातून मित्र परिवार फिरण्यासाठी बीच वर आले होते, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली. शशांक सिंग आणि पलारा पखर अशी बेपत्ता तरुणांची नावे आहेत. बेपत्ता तरुणांना शोधण्यासाठी रायगड पोलिस आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू टीम पायलट घटनास्थळी दाखल झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:

















