एक्स्प्लोर

Pune Metro : चाकण मेट्रो विस्तारावर शिक्कामोर्तब होणार? वाहतुक कोंडी कायमची सुटणार? अजित पवारांनी मुंबईत लावली बैठक

Pune Metro : हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याचा विडा अजित पवारांनी उचलला आहे. त्यासाठी अजित पवारांनी प्रत्यक्ष पाहणी दौरे ही केलेत. याचाच भाग म्हणून हा विस्तारित मेट्रो मार्ग सत्यात उतरवला जाणार आहे.

चाकण, पुणे : आयटी पार्क हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने नव्या मेट्रो मार्गाचा विस्तार कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याचं मार्गाची आणि त्यावरील प्रस्तावित स्टेशनची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली. या मेट्रो मार्गिकेवर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवडमधील भक्ती शक्ती चौकातून या मार्गाची सुरुवात होणार आहे. तिथून मुकाई चौक, भूमकर चौक, भुजबळ चौक, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, वल्लभनगर, टाटा मोटर्स कंपनी, तळवडे एमआयडीसी, चाकण एमआयडीसी मार्गे चाकण शहरापर्यंत पोहचेल. जवळपास 41 ते 42 किलोमीटरचा हा प्रस्तावित मार्ग असेल. यात काही बदल अपेक्षित आहेत. त्याचं अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन, या विस्तारित मेट्रोवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याचा विडा अजित पवारांनी उचलला आहे. त्यासाठी अजित पवारांनी प्रत्यक्ष पाहणी दौरे ही केलेत. याचाच भाग म्हणून हा विस्तारित मेट्रो मार्ग सत्यात उतरवला जाणार आहे. हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसी आणि तळवडे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरणार आहे. 

अजित पवारांनी दिली बैठकीची सोशल मिडीयावर माहिती (Ajit Pawar X Post)

आज पुण्यातील मेट्रो कार्यालयात रामवाडी ते वाघोली आणि विठ्ठलवाडी मेट्रो मार्ग एमएसआयडीसी एलिव्हेटेड रोडशी ओव्हरलॅप होत असल्याच्या विषयाबाबत व शहरातील मेट्रो लाइन विकास प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मेट्रो लाईन विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी ओव्हरलॅपसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारित सूचना केल्या.

नव्या मेट्रो मार्गामुळे रोजची वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. औद्योगिक तसेच व्यापारी क्षेत्रांमध्ये येणाऱ्या प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचून आर्थिक कार्यक्षमतेतही वाढ होईल. महाव्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, हा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

मेट्रो मार्गामुळे फक्त वाहनांची कोंडी कमी होणार नाही, तर पर्यावरणालाही दिलासा मिळेल. रस्त्यांवरील अतिरिक्त वाहतूक कमी झाल्याने प्रदूषणात घट होईल. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातील नागरिकांसाठी मोठा बदल घडवून आणणार आहे. मात्र, प्रकल्पाची नेमकी सुरुवात आणि पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी या मेट्रो प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget